Tarun Bharat

पोलिसांवर दरोडेखोरांचा गोळीबार; सुदैवाने बचावले API लांडे

फलटण / प्रतिनिधी : 

सराफाला लुटणाऱ्या दरोडेखोरांचा पाठलाग करताना दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे थोडक्यात बचावले. फलटण तालुक्यातील वडले गावात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, लांडे हे रविवारी सायंकाळी  सहकाऱ्यांसह जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधासाठी गेले होते. संशयित आरोपी असलेला माने नावाचा व्यक्ती वडले गावात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. यावेळी प्रविण प्रल्हाद राऊत (रा.चिखली) या दरोडेखोराला ताब्यात घेण्यात आले. मात्र, पप्पु उर्फ सुहास सोनवलकर (रा. वडले ता. फलटण) व प्रमोद ऊर्फ आप्पा ज्ञानदेव माने (रा. तामशेतवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर) हे दोघे दरोडेखोर पोलिसांच्या दिशेने गोळीबार करुन उसाच्या शेतातून पसार झाले. पसार झालेल्या दरोडेखोरांचा पाठलाग करताना त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारातून लांडे बचावले.

या दरोडेखोरांनी 26 ऑक्टोबर रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळशी ते मोरगाव रस्त्यावर सोने चांदी व्यावसायिकाची दुचाकी अडवून डोळ्यात मिरची पूड टाकत त्यांच्याकडील 11 लाख 66 हजारांचे दागिने चोरुन पलायन केले होते.  याबाबत अमर रंगनाथ कुलथे (रा. मोरगाव) या सराफ व्यावसायिकाने यासंबंधी फिर्याद दिली होती.

25 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहुर्तावर पळशीत सोने- चांदी विक्रीचे दुकान टाकणाऱ्या कुलथे यांना उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी लुटण्यात आले होते. या घटनेचा वडगाव पोलिसांकडून गेल्या महिनाभरापासून तपास सुरु आहे.  दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबाराची फिर्याद वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल निवृती भुजबळ (रा. वाल्हे ता. पुरंदर जि. पुणे) यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

Related Stories

बारामतीत बनावट ‘रेमडेसिवीर’चे रॅकेट उघडकीस

datta jadhav

वन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनावर ठेकेदाराचा डल्ला

Archana Banage

विकासकामांची भूमिपूजने म्हणजे सत्ताधाऱयांची नौटंकी

Patil_p

खते, बियाणे विक्री गैरप्रकाराबाबत जिल्हा परिषदेचे तक्रारीचे आवाहन

Archana Banage

मिरचीशेठचा बाजार रस्त्यातच

Patil_p

तिसऱया दिवशी देखील सातारा कडकडीत बंद

Amit Kulkarni