Tarun Bharat

पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान, सलग दुसऱ्या पेट्रोल पंपावर डिझेलची चोरी

प्रतिनिधी / अक्कलकोट

अक्कलकोट वागदरी रोडवरील मल्लिकार्जुन पेट्रोल पंप येथे दि २५ रोजी मध्यरात्री अंडर ग्राउंड डिझेल टाकीतून १४२० लिटर डिझेल धाडसी चोरी केली असून १ लाख २२ हजार ९८० रुपये किंमतीचे डिझेल पाईपच्या सहाय्याने काढून अज्ञात चोरट्याने अतिशय शिताफीने लंपास केले आहे. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की अक्कलकोट शहरातील ए एस मंगरुळे पेट्रोल पंप व वागदरी रोड अक्कलकोट येथील मल्लिकार्जुन पेट्रोल पंप असे दोन पंप आनंद सिद्रमाप्पा मंगरुळे चालवतात. गेल्या अठरा वर्षांपासून दोन्ही पंपावर मनोज आनंदराव शिंदे हे मॅनेजर म्हणून काम करतात दि २६ रोजी अक्कलकोट शहरातील ए एस मंगरुळे पेट्रोल पंपावर कामावर असताना मालकांनी मॅनेजरला कळवले की वागदरी रोड अक्कलकोट येथील मल्लिकार्जुन पेट्रोल पंपातील डिझेलची चोरी झाली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन खात्री करून हेल्पर माळप्पा धुळवे,मोबिन मुजावर यांना घेऊन पेट्रोल पंपाच्या डिझेल टाकीचे मॅनेजमेंट ( डीप ) व मीटर रिडींग चेक केले असता डिझेलच्या टाकीत तफावत दाखवली.रात्री पेट्रोल पंप बंद करण्यापूर्वी टाकीत १७७० लिटर डिझेल होते.पण सकाळी पाहिल्यानंतर टाकीत ३५० लिटर डिझेल होते.१४२० लिटर डिझेल टाकीत कमी असल्याचे दिसुन आले.

त्यानंतर तफावत कशामुळे झाली याची पाहणी केली असता पेट्रोल पंप कंपाउंडच्या बाजूला खाली जमिनीवर डिझेल पडलेले दिसले व त्याठिकाणी प्लास्टिक दोरी तार पडलेले दिसले त्यानंतर खात्री झाली की कोणीतरी अज्ञात इसमाने पेट्रोल पंपा मधील अंडरग्राउंड डिझेल टाकीत पाईप टाकून कशाच्या तरी साह्याने ओढून घेऊन डिझेलची चोरी केली आहे अशी फिर्याद पंप मॅनेजर मनोज आनंदराव शिंदे यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी, स पो नि विलास नाळे,पो ह विपीन सुरवसे, पो ह अंगद गीते यांनी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास पो ह राजेंद्र फुलारी हे करीत आहेत.

दि २४ रोजी मध्यरात्री वागदरी येथील शाब्दी पेट्रोल पंप मधील १५०० लिटर डिझेलची धाडसी चोरी झाली असून १ लाख ३५ हजार १७० किंमतीचे डिझेल चोरीस गेले होते.ही घटना ताजी असताना लागलीच २५ च्या मध्यरात्री अक्कलकोट- वागदरी रोडवरील मल्लिकार्जुन पेट्रोल पंपावरील १४२० लिटर डिझेल चोरी केली असून १ लाख २२ हजार ९८० रुपये किंमतीचे डिझेल चोरी गेले आहे.दोन्ही चोरी एकाच पध्दतीने केली असून चोरी करणारे चोर कर्नाटक राज्यातील असल्याची चर्चा केली जात आहे. सलग दोन दिवसात दोन पेट्रोल पंपावरील डिझेलच्या चोरीने चोरट्यानी पोलिसांना एक प्रकारचे आव्हानच दिले आहेत.

Related Stories

करमाळा तालुक्यासाठी 5 कोटी निधी मंजूर

Abhijeet Khandekar

सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलन पेटले

Archana Banage

माळीनगर येथे ‘ज्ञानोबा – तुकाराम’ चा नामघोष करत उभ्या रिंगण सोहळ्यात वारकरी रंगले

Kalyani Amanagi

सोलापूर : आशा वर्करला मारहाण करणाऱ्याची जेलमध्ये रवानगी

Archana Banage

मंगळवेढयात बंदला संमिश्र प्रतिसाद

Archana Banage

सोलापूरपासून चक्क ६५ किलोमीटर लांब असलेल्या गावात पोहोचून ‘त्यांनी’ दिले जखमी शृंगी घुबडाला जीवदान…

Archana Banage