Tarun Bharat

पोलिसांसाठी देखील आता कॅन्टीन सुविधा

Advertisements

प्रतिनिधी /   चिकोडी :

भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले, सेवा निवृत्त झालेले आणि भारतीय छात्र सेनेचे प्रकल्पाधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या जवानांसाठी केंद्र सरकारद्वारे संसारोपयोगी साहित्य सवलतीच्या दरात मिळावे यासाठी मिलिटरी कॅन्टीन सुविधा                                                                           देण्यात येते. याच धर्तीवर कर्नाटकात राज्य शासनाने देखील गेल्या काही वर्षापासून जिल्हा स्तरावर पोलीस कर्मचाऱयांसाठी कॅन्टीन सुविधा देण्यात प्रारंभ केला. बेळगाव जिल्हय़ातील पोलिसांसाठी हे कॅन्टीन बेळगाव येथे कार्यरत आहे. याबरोबरच चिकोडी येथेही सदर कॅन्टीन सुरू करण्यात आल्याने पोलीस कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

बेळगाव जिल्हा हा भौगोलिकदृष्टय़ा मोठा असल्याने जिल्हय़ातील अथणी तालुक्यातील शेवटच्या टोकावर सेवा बजावणाऱया पोलीस कर्मचाऱयांना बेळगावला जात जीवनावश्यक वस्तू पोलीस कॅन्टीनमध्ये खरेदी करणे खर्चिक बनले होते. ही बाब लक्षात घेऊन नुकतेच चिकोडी येथे सेवा बजावून बदली झालेले एएसपी मिथुनकुमार जी. के. यांनी पुढाकार घेऊन चिकोडी येथे पोलीस कॅन्टीन सुरू करण्यासाठी खात्यातील वरिष्ठांशी मसलत केली व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडीत नुकतेच पोलीस कॅन्टीन सुरु केले.

सवलतीच्या दरात जीवनावश्यक वस्तू

चिकोडी येथे सुरु करण्यात आलेल्या या पोलीस कॅन्टीनमध्ये किराणा, भुसारी, स्टेशनरी, सौंदर्य प्रसादने आदींसह रोजच्या जीवनासाठी लागणाऱया विविध प्रकारच्या वस्तू माफक दरात मिळतात. सदर वस्तूवरील सर्व सेवा शुल्क नसल्याने या वस्तू बाजारपेठेच्या तुलनेत स्वस्त दरात मिळत असल्याचे एका पोलीस कर्मचाऱयाने तरुण भारतशी बोलताना सांगितले. चिकोडी येथे सुरु करण्यात आलेल्या या पोलीस कॅन्टीनमुळे पोलीस कर्मचाऱयांचा वेळ व पैसा वाचणार असल्याने पोलीसवर्ग आनंदात आहेत.

भविष्यकाळात होम अप्लायन्सच्या वस्तूही मिळणार

पोलीस कॅन्टीनमध्ये भविष्यकाळात टीव्ही, रेफ्रिजिरेटर, वॉशिंग मशिन, मिक्सर, ग्रॅण्डर, फॅन आदीसारखी विविध इलेक्ट्रिक उपकरणे, मोबाईल्स, लॅपटॉप्स, कॅम्प्युटर आदी देखील उपलब्ध होणार असल्याचे तेथील कर्मचाऱयाने सांगितले. सदर वस्तू खरेदी करु इच्छिणाऱया पोलीस कर्मचाऱयाने कॅन्टीनकडे मागणीपत्र दिल्यास जिल्हा पोलीस प्रमुखांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊन सदर वस्तू कर्मचाऱयांना मिळणार आहेत.

 दुरुपयोग टाळण्यावर भर

पोलिसांसाठी सुरु करण्यात आलेल्या या कॅन्टीन सुविधेचा दुरुपयोग टाळण्यावर भर देण्यासाठी प्रशासनाद्वारे कर्मचाऱयांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत. या ओळखपत्रांच्या आधारे सदर वस्तू खरेदी करता येणार आहेत. अतिरिक्त खरेदी टाळण्यासाठी खरेदीची कमाल मर्यादा केवळ प्रति महिना 6 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी वगळता इतर कोणत्याही व्यक्तीला या कॅन्टीन सुविधेचा लाभ मिळणार नसल्याने दुरुपयोग टाळता येणार आहे.

 

Related Stories

जिल्हय़ातील 90 गावांतील लाभार्थ्यांना हक्कपत्रांचे वितरण

Amit Kulkarni

ज्ञानसागरातील मौल्यवान मोती श्रीपेवाडीचा ‘मंथन’

Amit Kulkarni

कर्फ्यु मागे; चौथा शनिवार असल्याने शुकशुकाट

Patil_p

सुळगे (ये.) ग्रा. पं. अध्यक्षपदी गंगव्वा नाईक

Amit Kulkarni

सदाशिवनगर येथे कोरोना रोगप्रतिकारक औषधांचे वितरण

Amit Kulkarni

बेळगावमध्ये होणार फ्लाईंग स्कूल

Patil_p
error: Content is protected !!