Tarun Bharat

पोलिसाच्या सतर्कतेमुळे बस स्थानकावर तिघांना पकडले

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव :

ई-पास घेवून एका राज्यातून दुसऱया राज्याला जाणाऱयांचा तपशील प्रशासनाकडे असतो. त्यामुळे त्यांच्यावर ट्रकही ठेवता येतो. मात्र चोरमार्गाने वेगवेगळय़ा शहरात शिरणाऱयांची संख्या वाढली असून अशा प्रवाशांमुळे कोरोनाचा धोकाही वाढत चालला आहे. महाराष्ट्र व गोव्यातून बेळगावला आलेल्या अशाच तिघा जणांना गुरुवारी क्वारंटाईनमध्ये पाठविण्यात आले.

मध्यवर्ती बसस्थानकावर सेवा बजावणाऱया एका पोलिसाच्या सतर्कतेमुळे महाराष्ट्र व गोव्यातून बेळगावात आलेल्या तीघा जणांना पकडण्यात आले. गुरुवारी दुपारी मध्यवर्ती बस स्थानकावर हा प्रकार घडला. बससेवा सुरु झाल्यामुळे गावी जाण्यासाठी हे तिघे जण बस स्थानकावर पोहोचले होते. मात्र त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारलेला होता.

वीटा, पुणे व गोव्यातून आलेले तीन तरुण दांडेली व बडसला जाण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानकावर आले होते. मिळेल तो ट्रक, कार मधून प्रवास करीत या तरुणांनी बेळगाव गाठले आहे. विटय़ाहून आलेल्या तरुणाची बस स्थानकावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली. त्यावेळी त्याच्या अंगात ताप असल्याचे आढळून आले. याबरोबरच कोरोनाची लक्षणेही दिसून आली.

बस स्थानकावर सेवा बजाविणाऱया एस. बी. मडिवाळ या पोलीस हवालदाराने तातडीने या तीनही तरुणांना बाजुला घेवून त्यांची चौकशी सुरु केली. मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी या तिघा जणांचा तपशील घेवून रुग्णवाहिकेतून त्यांना क्वारंटाईनमध्ये पाठविले.

विटय़ाहून आलेला तरुण खानापूर तालुक्मयातील बडसला जात होता. त्याचाच पारा अधिक होता. न कळत त्यांनी बसमधून प्रवास केले असते तर इतर प्रवाशांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्मयता अधिक होती. मात्र मध्यवर्ती बस स्थानकातील परिवहन मंडळाचे कर्मचारी व पोलिसाच्या सतर्कतेमुळे चोर मार्गाने बेळगावात आलेल्या तिघा जणांना क्वारंटाईनमध्ये पाठविण्यात आले आहे. आता त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.

Related Stories

बुधवारी 37 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

जिल्हय़ात 84 टक्के खरीप पेरण्या पूर्ण

Amit Kulkarni

देसाई बिल्डिंगमधील बँडेड कपडे, शूज सेलला अभूतपूर्व प्रतिसाद

Amit Kulkarni

लाईनमनवर पाच-सहा गावांचा ताण

Amit Kulkarni

अंध-दिव्यांग बसपास प्रक्रियेला वेग

Amit Kulkarni

पेंढारकर स्मृती नाटय़ अभिवाचन स्पर्धेत रंगभूमी ग्रुप उत्तेजनार्थ

Patil_p
error: Content is protected !!