Tarun Bharat

पोलिसाला धमकी प्रकरणी आरोपीला 1 वर्ष कारावास

प्रतिनिधी / रत्नागिरी :

हातभट्टीवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांला धमकी देवून अडवणूक करणाऱया हातभट्टीचालकाला न्यायालयाने 1 वर्ष कारावास व 10 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी चंद्रकांत सिताराम लाड (54, ऱा तुळसणी त़ा संगमश्वर) असे  आरोपीचे नाव आह़े

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी येथे 7 नोव्हेंबर 2011 रोजी ही घटना घडली होत़ी घरी हातभट्टीची दारू असल्याच्या संशयातून छापा टाकण्यासाठी आलेल्या पोलिसाला दमदाटी करणे व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चंद्रकांत याच्याविरूद्ध देवरूख पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा नुकताच या खटल्याचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधिश एल़ डी बिले यांनी दिल़ा सरकारी पक्षाच्यावतीने ऍड़ प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिल़े

     तुळसणी येथे अवैधरित्या हातभट्टी दारू विक्री होत असल्याची तक्रार गावचे पोलीस पाटील व तंटामुक्ती समितीच्या सदस्यांनी देवरूख पोलीस ठाण्यात केली होत़ी त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद यशवंत ओगले हे 7 नोव्हेंबर 2011 रोजी छापा टाकण्यासाठी चंद्रकांत लाड याच्या घरी गेले होत़े यावेळी लाड याने हातात लाकडी बांबू घेवून तू स्वतःला समजतोस कोण, आता तुला दाखवतोच असे बोलून धमकी दिल़ी तसेच छापा टाकण्याच्या कामात अडथळा निर्माण केल़ा असा आरोप लाड यांच्याविरूद्ध ठेवण्यात आला होत़ा

 

 

Related Stories

26/11चा शाहिद हुतात्माना श्रद्धांजली

Patil_p

अभिनेत्रीचा खून अनैतिक संबंधांतून झाल्याचे उघड

Archana Banage

दिलासादायक : बाधितवाढ चारशेच्या खाली

datta jadhav

आज 25 जणांना सोडले घरी ; 171 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

Archana Banage

नुसतीच जिल्हा बँकेत खलबत्ते

Patil_p

जावली निघाली साठी पूर्ण करून पूढे !कोरोनाला ब्रेक लागेना

Patil_p