Tarun Bharat

पोलिस कोठडीतच आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न

Advertisements

पंढरपूर / प्रतिनिधी

पंढरपूरातील तुंगत या ठिकाणी घडलेल्या बलात्काराच्या घटनेतील संशयित आरोपीनेच पोलीस कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अर्जुन शितोळे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की ,गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास येथील तालुका पोलीस ठाण्याच्या कोठडीत असणाऱ्या आरोपी अर्जुन शितोळे याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर या संशयित आरोपीस तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. येथील खासगी रुग्णालयात या आरोपीवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेमध्ये आरोपीने कोठडीत टॉवेलच्या सहाय्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीवर बलात्काराचा आणि ॲट्रॉसिटीचा 12 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीस 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यातच आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सदरची घटना समजताच अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पोलिस उपाधीक्षक डॉ. सागर कवडे यांनी रुग्णालयात जाऊन आरोपीची भेट घेतली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले असल्याची माहिती सध्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे

 

Related Stories

चंदनाची झाडे तोडणारे दोघे सापडले रंगेहाथ

Sumit Tambekar

सोलापूर : लॉकडाऊनविरोधात आजपासून व्यापारी रस्त्यावर

Abhijeet Shinde

बार्शीतच कोरोना प्रयोग शाळेस परवानगी द्या – आमदार राऊत

Abhijeet Shinde

अक्कलकोटमधील मृत व्यापाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

Solapur; जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज उमेदवारांचे भवितव्य धोक्यात

Abhijeet Khandekar

मुद्रांक शुल्कातून उद्दिष्टाच्या आठ कोटी अधिक शासनास महसूल

Sumit Tambekar
error: Content is protected !!