Tarun Bharat

पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या

Advertisements

33 उपअधीक्षक, 48 निरीक्षकांचा समावेश : आणखी बदल्यांची शक्यता

प्रतिनिधी / बेळगाव

राज्यातील 33 पोलीस उपअधीक्षक व 48 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री गृहखात्याने बदल्यांचा हा आदेश जारी केला आहे. बेळगाव शहर व जिल्हय़ातील काही अधिकाऱयांचा यामध्ये समावेश आहे.

बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक के. शिवारेड्डी यांची गुप्तचर विभागात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर सध्या एसीबीमध्ये असलेले गणपती गुडाजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धारवाड ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक रवी डी. नायक यांची शिर्शा येथे बदली करण्यात आली आहे.

गोकाकच्या पोलीस उपअधीक्षकपदी जावीद इनामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक आनंद कब्बुरी यांची बदली दावणगेरी येथील डीसीआरबी विभागात करण्यात आली आहे. लवकरच बदल्यांची आणखी यादी येण्याची शक्मयता आहे.

Related Stories

ऐन हंगामात लॉकडाऊनमुळे जनावरांचे बाजार बंद

Patil_p

कक्केरी येथे शेतकऱयाचा खून

Patil_p

वॉर्ड पुनर्रचना-आरक्षण फेरविचार याचिकेवर आज सुनावणी

Amit Kulkarni

सामूहिक ममदय़ाचा अष्टे येथे कार्यक्रम

Patil_p

‘वंदे मातरम्’ समूहगीत स्पर्धेचे उद्घाटन

Amit Kulkarni

नेहरुनगर इंदिरा कॅन्टीनजवळ अस्वच्छतेमुळे दुर्गंधी

Amit Kulkarni
error: Content is protected !!