Tarun Bharat

पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांना विशेष सेवा पदक

Advertisements

वार्ताहर / मुरगूड

येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुमार दत्तात्रय ढेरे यांना महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय कुलाबा मुंबई यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत विशेष सेवा पदक 2020 जाहीर करण्यात आले आहे. गडचिरोली या नक्षलग्रस्त भागांमध्ये पोलीस दलाचे अधिकारी म्हणून एक वर्ष समाधानकारक सेवा पूर्ण केल्याबद्दल त्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे.

कुर्डू ता. करवीर येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील कुमार ढेरे हे भोगावती महाविद्यालयात विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस दलात भरती झाले. एप्रिल 2015 पासून ते पोलिस सेवेत रुजू झाले. सुरुवातीला त्यांनी एक वर्ष मुंबई शहर पोलिसात सेवा बजावली. त्यानंतर 2016 पासून सलग तीन वर्षे त्यांनी गडचिरोली या नक्षलग्रस्त भागांमध्ये खडतर सेवा बजावली.

विशेष सेवा पदकाबद्दल त्यांचा पोलीस ठाण्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या या पदकप्राप्तीबद्दल अभिनंदन होत आहे. विशेष सेवा सन्मानामुळे आपल्यावर कामाची अधिक गुणवत्ताधारक कामाची जबाबदारी वाढल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

स्थगिती उठविण्यासाठी घटनापीठाकडे प्रयत्न करा

Abhijeet Shinde

उसने दिलेले पैसे मागूनही न दिल्याने वृध्दाची आत्महत्या

Abhijeet Shinde

पुराच्या पाण्यातून जीवघेणी वाहतूक, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा धोकादायक प्रवास

datta jadhav

कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्या

Abhijeet Shinde

इस्पुर्ली डावा कालव्याचा परिसर बनला मद्यपींचा अड्डा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ई वॉर्डातील ८ प्रभागात बायपासने पाणीपुरवठा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!