Tarun Bharat

पोलीस कर्मचाऱ्याने जपली रक्तातील माणुसकी

मालवण/ प्रतिनिधी-

पोलीस खात आणी एकंदरीतच पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल समाजात असलेल्या नकारात्मक प्रतीमेला ब-याचवेळा खात्यातील कर्मचा-यानी माणुसकी जपुन छेद दिलेल्या बातम्या आपण अधुनमधुन वाचत असतो.अशीच एक घटना नुकतीच ओरसमध्ये घडली असुन कणकवली कलमठ येथील पोलीस कर्मचारी श्री.भूषण सुतार यानी मुसळधार पावसात चक्क मध्यरात्री ओरस जिल्हा रक्तपेढीत येवुन एका रुग्णासाठी रक्तदान करून रक्तातील माणुसकी जपली आहे.


याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दि. १४ जुलै रोजी अन्नपूर्णा गुणाजी राऊळ या पेशंटच्या ऑपरेशनसाठी सावंतवाडी येथे दुर्मिळ अशा बी निगेटिव्ह रक्ताची तातडीची गरज असल्याचे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष महेश राऊळ यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी कळविले असता महेश राऊळ यांनी ही बातमी रक्तदाते भूषण सुतार यांना कळविली. ऑपरेशन दि.१४ रोजी सकाळी असल्याने वेळ वाया न घालवता मध्यरात्री १२.४५ वाजता नियमित रक्तदाते श्री भुषण सुतार (कलमठ, कणकवली) यांनी मुसळधार पावसाचा विचार न करता तात्काळ ओरोस रक्तपेढी येथे येवुन दुर्मिळ रक्तगटाचे अमूल्य असे रक्तदान केले.

 

Related Stories

कारिवडे येथील सौ. कल्पना परब यांचे निधन

Anuja Kudatarkar

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत निरवडे-बांद्यात करिष्मा

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : वरवलीत तब्बल २७ जणांना कोरोनाची बाधा

Archana Banage

सावंतवाडीत दोन खासगी कोविड सेंटर

NIKHIL_N

उद्योजक नामदेव मराठे यांचे निधन

NIKHIL_N

खंडित वीज पुरवठय़ाबाबत अधिकाऱयांना जाब

NIKHIL_N
error: Content is protected !!