Tarun Bharat

पोलीस कारवाई विरोधात आज बेळगाव सराफपेढी बंद

Advertisements

जिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांना देणार निवेदन

प्रतिनिधी / बेळगाव

बेंगळूरचे पोलीस असे सांगून सराफ व्यापाऱयाला अरेरीवी करून 10 तोळे सोन्याची मागणी करणाऱया पोलीस कारवाईविरोधात बेळगाव सराफी व्यापाऱयांनी आपला व्यवसाय बंद ठेवून जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना शुक्रवारी 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता निवेदन देण्यात येणार आहे. गुरुवारी घेण्यात आलेल्या बेळगाव सराफी व्यापारी संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दुर्गाभवन येथे ही बैठक घेण्यात आली. गणपत गल्ली येथील महाबळेश्वर शेजेकान यांच्याकडे गुरुवारी सकाळी आम्ही बेंगळूर पोलीस आहोत, असे सांगून 10 तोळे सोन्याची मागणी करत अरेरावी केली. बळजबरीने त्यांना पोलीस वाहनात बसण्यास सांगण्यात आले. यावेळी त्यांना मानसिक ताण आला. शेजेकान यांनी ऍसिड प्राशन केल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महाबळेश्वर शेजेकान हे प्रतिष्ठित व्यक्ती असून कर्नाटक दैवज्ञ स्कूलचे चेअरमन व दैवज्ञ ज्वेलर्स संघटनेचे सल्लागार आहेत. वारंवार त्यांना पोलिसांचा त्रास सोसावा लागत आहे. या पूर्वीही दोनवेळा पोलिसांनी शेजेकान यांच्या दुकानात सोने व पैशांची मागणी केली होती. अशा प्रतिष्ठित व्यक्तींना त्रास करीत असल्याने सराफी व्यापारी संघटनेने स्वईच्छेने गुरुवारी दुकाने बंद केली.

पोलीस कारवाई विरुद्ध बेळगाव सराफी व्यापारी संघटनेने शुक्रवारी सराफपेढी बंद ठेऊन जिल्हाधिकारी व बेळगाव पोलीस आयुक्तांना निवेदन देण्याचा निर्धार केला.

याबाबत संघटनेचे अध्यक्ष दयानंद कारेकर यांनी ही माहिती दिली. यावेळी प्रकाश राजमाने, मिलिंद सांबरेकर, नितीन चिकोर्डे, गजानन शिंदे यांच्यासह अनेक सराफी व्यापारी उपस्थित होते. या बंदला दैवज्ञ ज्वेलर्स सघंटनेनेही पाठिंबा दर्शविला आहे.

error: Content is protected !!