Tarun Bharat

पोलीस निरीक्षकाविरोधात वकिलांचे आंदोलन

अवमान केल्याने तीन तास रास्तारोको, माळमारुती पोलीस निरीक्षकांनी माफी मागितल्यानंतर आंदोलन मागे

प्रतिनिधी / बेळगाव

पोलीस स्थानकामध्ये गेले असता आपला अवमान केला म्हणून वकिलांनी माळमारुती पोलीस स्थानकाच्या निरीक्षकाविरोधात वकिलांनी जोरदार आंदोलन केले. न्यायालयासमोरील मुख्य रस्त्यावर रास्तारोको करुन आंदोलन केले. जोपर्यंत पोलीस निरीक्षक माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा वकिलांनी दिला. त्यामुळे पोलीस निरीक्षकांना घटनास्थळी येवून माफी मागावी लागली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्याकडे पक्षकाराला घेवून वकील गेले होते. त्यावेळी उद्धट उत्तरे दिली. त्यानंतर आणखी काही वकील त्यांना भेटण्यास गेले असता त्यांनाही अपशब्द वापरण्यात आल्याचा आरोप वकिलांनी केला. त्यामुळे संतापलेल्या वकिलांनी न्यायालयासमोरील मुख्य रस्त्यावर शुक्रवारी रास्तारोको केला. यामुळे मोठा गोंधळ उडाला. वकिलांच्या विरोधात अपशब्द वापरणाऱया पोलीस निरीक्षकाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

माफी मागावी तेंव्हाच आम्ही आंदोलन मागे घेवू असा निर्धार वकीलांनी केला. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वकीलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एक पोलीस निरीक्षक वकिलांना अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे त्याने स्वतः येवून वकिलांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. त्यानंतर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे देखील वकीलांची भेट घेण्यास आले. मात्र त्यांच्याही विनंतीला वकिलांनी मान दिला नाही.

जोपर्यंत पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे स्वतः येवून माफी मागत नाहीत तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार असा इशारा देण्यात आला. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे घटनास्थळी आले. त्यांनी मी असे काही बोललो नाही,  तरी देखील मला माफ करा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर वकीलांनी हे आंदोलन मागे घेतले. बार असोसिएशनचे उपाध्यक्ष सी. टी. मजगी, माजी अध्यक्ष एस. एस. किवडसण्णावर, ऍड. श्रीधर मुतगेकर, ऍड. पी. के. पवार, ऍड. आर. जी. भाई, ऍड. अमर येळ्ळूरकर, ऍड. नामदेव मोरे, ऍड. संतोष गडकरी, ऍड. दीपक औरादकर, ऍड. सुधीर गावडे यांच्यासह वकील उपस्थित होते.

Related Stories

बेळवट्टी भागात बसफेऱ्या वाढवा

Patil_p

राखीव दलाच्या सहाव्या तुकडीचे आज पथसंचलन

Patil_p

बेळगावच्या युवा सैनिकांनी घेतली आदित्य ठाकरे यांची भेट

Amit Kulkarni

वडापचालक प्रवाशांच्या प्रतीक्षेत …

Patil_p

खंडेनवमीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

Amit Kulkarni

परीक्षा घोटाळे : प्रामाणिकतेला टाळे!

Amit Kulkarni