Tarun Bharat

पोलीस वेलफेअर फंडला एक लाखाचा मदतनिधी

प्रतिनिधी/ सातारा

खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यावर अफाट प्रेम करणारा त्यांचा चाहतावर्ग राज्यासह देशभरात आहे. उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदोत्सवच असतो. यानिमित्ताने मग विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात. अशाच सामाजिक बांधिलकीतून पोलीस दलाला सलाम म्हणून उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय असलेल्या युवा उद्योजक शैलेश संकपाळ व ऍड. जयेश यमकर यांनी पोलीस वेलफेअर फंडला एक लाख रुपयांचा मदतनिधी देत आगळ्या वेगळ्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

            खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना पोलीस वेलफेअर फंडासाठी एक लाखाचा निधीचा धनादेश खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पुण्यात सुपूर्द करण्यात आला. यावेळी शैलेश संकपाळ, ऍड. जयेश यमकर, जितेंद्र खानविलकर, काका धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम पुण्यातील व्हीहीआयपी सर्किट हाऊस येथे झाला.

  यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शुभेच्छा व्यक्त करुन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या निधीबद्दल धन्यवाद व्यक्त केले.

Related Stories

सातारा पालिकेच्या लेट लतिफांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने केली कारवाई

Archana Banage

धडाकेबाज महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ

datta jadhav

सातारा : युवकांनी गावाचा लौकिक वाढवावा

datta jadhav

सातारा : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पुढाऱ्यांना जेलमध्ये टाका

datta jadhav

हॉटस्पॉट तालुक्यांसह स्थिती आटोक्यात

datta jadhav

जिल्ह्यातील 35 नागरिक कोरोनामुक्त; आज सोडण्यात आले घरी

Archana Banage