Tarun Bharat

पोल्ट्री व्यावसायिकांचे दरवाढीसंदर्भात निवेदन

वार्ताहर /किणये

सध्या बाजारात चिकनचा दर वाढलेला आहे. प्रत्यक्षात मात्र पोल्ट्री उत्पादकांना म्हणावा तसा दर मिळत नाही. यामुळे पोल्ट्री फार्मर्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने मच्छे येथील क्वॉलिटी ऍनिमल्स फिड्स प्रा. लिमिटेड या कंपनीला बुधवारी निवेदन देऊन चिकन उत्पादकांना योग्य दर देण्याची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वीच बेळगावातील पोल्ट्री उत्पादक शेतकऱयांनी बॉयलर पोल्ट्री फार्मर्स वेल्फेअर असोसिएशनची स्थापना केली असून या असोसिएशनच्यावतीने क्वॉलिटी ऍनिमल फिडच्या अधिकाऱयांना भेटून निवेदन देण्यात आले आहे.

तसेच सध्याचा आम्हा पोल्ट्री उत्पादकांना मिळणारा दर परवडणारा नाही. बाजारात मात्र चिकनला बऱयापैकी दर आहे. आम्हा उत्पादकांनाही योग्य दर मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच पोल्ट्री उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ देण्याची मागणीही केली आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष नागेश कोरवी, उपाध्यक्ष नारायण नलवडे, सचिव बाबू कुलम व संचालकवर्ग उपस्थित होता.

Related Stories

जीवनविद्या मिशनतर्फे महिलांशी संवाद

Amit Kulkarni

शेतकऱयांना देण्यात येणाऱया पीक कर्जात होणार वाढ

Amit Kulkarni

त्यांना काळजी आपल्या चिमण्या-पाखरांची

Patil_p

घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला बाजारात गर्दी

Amit Kulkarni

मार्कंडेय कारखान्यावर संचालक-शेतकऱयांची बैठक

Amit Kulkarni

जंगलाच्या हक्काची लढाई म्हणजे नव्या स्वातंत्र्याची लढाई

Amit Kulkarni