Tarun Bharat

पोळने जेधे, शेख, भंडारी यांचे खून माझ्यासमोर केले

Advertisements

माफीची साक्षीदार मांढरेची महत्वपूर्ण साक्ष : पुढील सुनावणी 2 जानेवारी रोजी

प्रतिनिधी/ सातारा

वाई तालुक्यात तथाकथित डॉ. संतोष पोळ खून खटल्यात शनिवारी सातारा जिल्हा  न्यायालयात झालेल्या सुनावणीत माफीची साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरे हिची महत्वपूर्ण साक्ष नोंदवण्यात आली. मंगला जेधे, सलमा शेख व नथमल भंडारी यांचे खून संतोष पोळ याने कसे केले याचा घटनाक्रम सांगताना हे तिन्ही खून पोळ याने माझ्यासमोर केले असल्याचे तिने न्यायालयासमोर सांगितले. हा खटला आता निर्णायक वळणावर असून याची पुढील सुनावणी 2 जानेवारी रोजी नव्या वर्षात होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला व देशाला हादरवणाऱया वाई-धोम हत्यांकाड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहत असून शनिवारी ते न्यायालयात उपस्थित होते. यावेळी सरकार पक्षातर्फे ऍड. उज्ज्वल निकम यांनी ज्योती मांढरेची साक्ष घेतली. या खुनाच्या मालिकेतील मंगला जेधे, सलमा शेख व व्यापारी नथमल भंडारी यांचे खून पोळने का केले, कशासाठी केले, कोठे केले याचा घटनाक्रमाच मांढरे हिने न्यायालयासमोर मांडला. मी पोळच्या संपर्कात येण्यापूर्वीच त्याने तीन खून केले होते तर मी संपर्कात आल्यानंतर मंगला जेधे, सलमा शेख व नथमल भंडारी यांचे खून केले. यातील बहुतेक खून हे पोळ याने पैशाच्या व सोन्याच्या हव्यासापोटीच केल्याची साक्ष ज्योती मांढरे हिने न्यायालयात दिली.

वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने शनिवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी संतोष पोळ याने माझ्यासमोर मंगला जेधे, सलमा शेख, भंडारी यांचा इंजेक्शन देऊन खून केला असून त्यानंतर आनंद व्यक्त केला. तसेच बहुतेक खून हे पोळने सोने व पैशाच्या हव्यासापोटी केल्याची साक्ष माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने न्यायालयात दिली. दरम्यान, पोळच्या सांगण्यावरून आपणच मंगला यांना पोळच्या पोल्ट्री फार्मवर आणल्याचेही तिने यावेळी सांगितले.

यावेळी मांढरे हिने जेधे, शेख तसेच भंडारी यांचे दागिने पोळ याने कशाप्रकारे घेतले तसेच मांढरे हिला त्यातील दिलेला दागिना तिने कोठे गहाण ठेवला होता. तसेच त्यांचा खून कसा व कोठे केला याबाबत मांढरे हिने न्यायालयासमोर महत्वपूर्ण साक्ष नोंदवली आहे. त्यानंतर पोळचे वकील ऍड. श्रीकांत हुडगीकर यांनी उलट तपासणीला सुरूवात केली परंतु, न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्याने पुढील सुनावणी दोन जानेवारीला होणार आहे. दरम्यान, पोलिसांनी सुनावणीवेळी चोख बंदोबस्त ठेवल्याने ऍड. निकम व ऍड. हुडगीकर यांच्याशिवाय इतर कोणालाही न्यायाधिशांच्या दालनात जाता आले नाही.

Related Stories

भाजप – संभाजी ब्रिगेड युती ?; भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

Archana Banage

सातारा जिह्यात बर्ल्ड फ्लुचा धोका नाही

Patil_p

कोल्हापूर विभागात सातारा द्वितीय

Patil_p

भाषिक अल्पसंख्यांक कार्यालय मुंबईत करू

Abhijeet Khandekar

संचारबंदीचा वाहनधारकांकडून गैरफायदा; महाराष्ट्र हद्दीत सोडण्यासाठी दोन हजार रूपये

Archana Banage

पिस्टलसह गावटी कट्टा हस्तगत

Patil_p
error: Content is protected !!