Tarun Bharat

पोळे चेकनाक्यावर जलद अँटिजन चाचणी सुरू

Advertisements

प्रतिनिधी /काणकोण

गोव्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन 5 जुलैपर्यंत संचारबंदीमध्ये राज्य सरकारने वाढ केलेली असतानाच पोळे चेकनाक्यावर कडक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. कर्नाटक तसेच अन्य राज्यांतून पोळे चेकनाक्यावरून गोव्यात प्रवेश करू इच्छिणाऱया नागरिकांसाठी जलद अँटिजन चाचणीची व्यवस्था या ठिकाणी 26 पासून सुरू करण्यात आली आहे.

त्याची जबाबदारी आरोग्यम् पॅथोलॉजी या एका बिगरसरकारी यंत्रणेकडे देण्यात आलेली असून सध्या तरी 24 तास ही यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहे. दोन तुकडय़ांनी ही यंत्रणा काम करत असल्याची माहिती या ठिकाणी काम करत असलेल्या कार्यकर्त्यांनी या केंद्राला ज्यावेळी प्रत्यक्ष भेट दिली त्यावेळी दिली.

अन्य राज्यांतून गोव्यात प्रवेश करणाऱया प्रत्येक नागरिकाची या ठिकाणी अँटिजन चाचणी केली जाते. त्यासाठी प्रत्येकाकडून 48 तासांसाठी 270 रु. फी आकारली जाते. अवघ्या 15 मिनिटांत त्या व्यक्तीचा अहवाल दिला जातो. सदर व्यक्ती निगेटिव्ह आढळली, तर त्या व्यक्तीला गोव्यात प्रवेश दिला जातो आणि पॉझिटिव्ह आढळली, तर परत पाठविण्यात येणार आहे. मात्र अजूनपर्यंत एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली नसल्याची माहिती या केंद्रावर काम करणाऱया कार्यकर्त्यांनी दिली.

पोळे चेकनाक्यावरील पोलीस आणि अन्य खात्यांचे कर्मचारी देखील अत्यंत सतर्कतेने या ठिकाणी काम करत असून कोणत्याही परिस्थितीत अन्य राज्यांतील कोरोनाबाधित व्यक्ती गोव्यात येणार नाही यासाठी अत्यंत बारकाईने लक्ष दिले जात आहे. माजाळी चेकनाक्यावर देखील अशीच सतर्कता बाळगण्यात येत असल्याचे दिसत आहे.

Related Stories

503 नवे रुग्ण, 688 जण कोरोनामुक्त

Patil_p

सांगे प्रभाग 1 मधील मतदारांकडून न्यायालयाच्या निकालाचे स्वागत

Amit Kulkarni

मंगळसूत्र हिसकावण्याच्या गुह्यात वाढ

Patil_p

तुळशिमळा पर्ये येथे अवजड ट्रक कलंडल्यामुळे अपघात

Amit Kulkarni

शॅडो कौन्सिल राबविणार संपर्कविरहीत प्रचार मोहीम

Amit Kulkarni

मडगाव पालिकेच्या बायोमिथेनेशन लघुप्रकल्पास मुदतवाढ

Amit Kulkarni
error: Content is protected !!