Tarun Bharat

पोळे ते माशेपर्यंतच्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण गेले वाहून

प्रतिनिधी /काणकोण

मडगाव-कारवार मार्गावरील पोळे ते माशेपर्यंतच्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण पहिल्या पावसातच पार वाहून गेले असून भर पावसात केलेल्या या डांबरीकरणाचा परिणाम काय झाला हे माशे-दापट येथील रस्त्याकडे पाहिल्यानंतर दिसून येईल असे लोलये-पोळेचे माजी सरपंच अजय लोलयेकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

पोळे ते गुळेपर्यंतच्या साधारणपणे 12 कोटी रु. खर्चाच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचा शुभारंभ मार्चच्या पहिल्या आठवडय़ात पोळे येथून करण्यात आला होता. मेच्या अखेरपर्यंत गुळेपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी घोषित करण्यात आले होते. प्रत्यक्षात मे महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात या कामाला प्रारंभ करण्यात आला. एका बाजूने पाऊस पडत असताना दुसऱया बाजूने डांबरीकरणाचे काम चालू ठेवल्याबद्दल आपण आक्षेप घेतला म्हणून माशेनंतरचे काम स्थगित ठेवण्यात आले. परंतु ज्या भागात हे डांबरीकरण झालेले आहे त्याची सध्याची अवस्था बघितल्यास नव्या तंत्रज्ञानाचा हाच परिणाम की काय अशी शंका येत असल्याची प्रतिक्रिया लोलयेकर यांनी व्यक्त केली आहे. पोळे ते माशेपर्यंत बऱयाच ठिकाणचे डांबरीकरण वाहून गेलेले असून ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत.

Related Stories

प्रियोळ प्रगती मंचतर्फे रक्तदान शिबिर उत्साहात

Amit Kulkarni

राज्याला मोफत पाणी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Patil_p

चिखली कोलवाळ येथे बांध फुटल्याने पाणी शेतात

Omkar B

वास्को शहरातील धोकादायक इमारतींमुळे लोकांच्या जीवाला धोका

Amit Kulkarni

कोविड योद्ध्यांचा केवळ सत्कार, पगार नाहीच

Amit Kulkarni

लाईनमनना वाढीव विमा व नोकरीची सुरक्षा देणार

Amit Kulkarni