Tarun Bharat

पोवईनाक्यावर जुगार खेळणारे नऊजण ताब्यात

रोख रक्कम, गाडय़ांसह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी/ सातारा

साताऱयातील पोवईनाका परिसरात असलेल्या सातारा दूध डेअरीसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळत असलेल्या 9 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी छापा टाकून कारवाई केली. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, 3 मोबाईल, 3 दुचाकी व 2 रिक्षा असा एकूण 3 लाख 15 हजार 810 रुपये मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 रोजी रात्री ही कारवाई पोलिसांनी केली असून पोवईनाका परिसरसातील सातारा दूध डेअरीसमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अक्षय आराम वाघमारे (वय 24, रा. शाहूनगर, जगतापवाडी, सातारा), संतोष दिलीप मतकर (वय 32 रा. मंगळवार पेठ, सातारा), अमर चंद्रकांत जाधव (वय 33 रा. शाहूपुरी, सातारा), अक्षय नंदू जाधव (वय 23 रा. करंजेपेठ, सातारा), अक्षय संजय जाधव (वय 25 रा. रविवार पेठ, सातारा), फिरोज युनुस पठाण (वय 50 रा. सदरबझार, सातारा), सुभाष वसंत मोरे (वय 45 रा. बेबलेवाडी, ता. सातारा), सुमित परशुराम बनसोडे (वय 32 रा. म्हसवे, ता. सातारा) व जीवन कृष्णा काळे (वय 52 रा. करंजेपेठ, सातारा) हे जुगार खेळत होते.

छाप्यावेळी या सर्वांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, 3 मोबाईल, 3 दुचाकी व 2 रिक्षा असा एकूण 3 लाख 15 हजार 810 रुपये मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या सर्वांवर सीआरपीसी अन्यवे कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

लोकसंख्येनुसार आरक्षण शक्य

datta jadhav

कोल्हापुरात आणखी 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

धक्कादायक ! नाशिकमध्ये दोन बहिणींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Tousif Mujawar

पूरग्रस्तांची घरे बांधून फेडरल बँकेने आदर्श उभा केला – मंत्री यड्रावकर

Archana Banage

नीलम गोऱ्हे-मुख्यमंत्री शिंदे भेटीने राजकीय चर्चांना उधाण ; नीलम गोऱ्हे म्हणाल्या, तर शिंदे गटात जाण्याचा…

Archana Banage

बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार ?

Tousif Mujawar