Tarun Bharat

पोवईनाक्यावर भरदिवसा युवकाला दीड लाखाला लुटले

प्रतिनिधी / सातारा :

पोवईनाका येथील लाटकर पेढेवाले यांच्या दुकानासमोरून दुचाकीवरून निघालेल्या अरूण धनराज गुजले (वय 24, रा. वेळे कामथी ता. सातारा) याला दुचाकीवरून येणाऱ्या दोन अज्ञातांनी कट का मारला अशी विचारणा करत मारहाण केली. तसेच त्याच्या दुचाकीच्या डिकीत असणारे 1 लाख 56 हजार रूपये लुटले. अवघ्या काही मिनिटांमध्ये घडलेल्या थरारक घटनेने परिसर हादरुन गेला असुन भर दिवसा घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण धनराज गुजले हे एका खासगी कंपनीत काम करत आहेत. शुक्रवारी सकाळी 11.15 च्या सुमारास ते बँकेत पैसे भरण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. दुचाकी पोवई नाक्यावर आल्यानंतर लाटकर पेढेवाले दुकानासमोर त्यांना दोन अज्ञात युवकांनी अडवले. आमच्या दुचाकीला कट का मारला, अशी विचारणा करत मारहाण केली. यावेळी एकाने धनराज यांच्या गाडीची डिकी उघडून त्यात ठेवलेले 1 लाख 56 हजार एवढी रोख रक्कम घेऊन तेथून पलायन केले. ही बाब धनराज यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. परंतु संशयित तेथून पसार झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत.

Related Stories

बाधित वाढ 500 च्या खाली

datta jadhav

माणदेशी फाउंडेशन आणि स्टेट बँक यांच्या संयुक्त विध्यमाने ग्रामीण भागातील महिला उधोजीकाना कर्ज वाटप

Omkar B

शहरात लक्ष्मी टेकडी झोपडपट्टीमध्ये कोरोना टेस्टवरून रोष

Patil_p

कोरोना लस संशोधनात कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग

Archana Banage

उघडय़ा गटारामुळे अनेकांचे जीव धोक्यात

Patil_p

आता ही तर सुरुवात आहे…जामीन मंजूर झाल्यानंतर आ. जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया

Abhijeet Khandekar