Tarun Bharat

पोवई नाक्यावरचा रस्ता खचला; बांधकाम विभागाकडून मलमपट्टी सुरु

वाहतूक विभागाच्या जवानाने प्रकार निदर्शनास आणला

प्रतिनिधी / सातारा

येथील पोवई नाका परिसरात ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. हे काम अंतिम टप्यात आले असतानाच गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रस्ता खचण्याचा प्रकार घडला. ही बाब जेव्हा वाहतूक शाखेचे जवानाने निदर्शनास आणून दिली तेव्हा मात्र बांधकाम विभागातील तेथील टीएण्डटी कंपनीच्या कर्मचाऱयांसह ताराबंळ उडाली. परंतु त्वरित तात्पुरती मलम पट्टीचे काम हाती घेण्यात आले आहे.

पोवई नाक्यावर महत्वकांक्षी ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. हे काही टक्केच उरले आहे. काही दिवसामध्ये काही पूर्ण होण्याची शक्यता आहे. असे असताना गुरुवारी सकाळी राजपथकडून येणाऱया रस्ता हा अर्धा फुट भाग खचल्याची बाब वाहतूक शाखेचे जवान यांच्या निदर्शनास आली. त्यांनी धोकादायक वाहतूक होवू नये म्हणून बॅरिकेट लावले. त्यावरुन टीऍण्ट टी कंपनीच्या कर्मचाऱयांची आणि त्यांची थोडीशी वादावादीही झाली. बांधकाम विभागास त्यांनी माहिती दिली. लगेच बांधकाम विभागाचे अधिकारी तेथे आले अन् त्यांनी पाहणी करत लगेच जेसीबीच्या सहाय्याने तेवढा डांबरीकरणाचा भाग उकरुन काढत पुन्हा नव्याने पॅचिंग करण्याचे काम हाती घेतले. त्याबाबत बांधकाम विभागाचे अभियंता रविंद्र आंबेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रस्ता खचलेला नाही. खडी जरा सरकली होती. ते काम करुन घेण्यात येत आहे.

Related Stories

‘आज माझी मोहीम पूर्ण…’; संजय पांडेंच्या अटकेनंतर मोहित कंबोज यांचे ट्विट

Archana Banage

विसावा नव्हे पंढरपूरपर्यंत 40 वारकऱ्यांच्यासह पायी जाण्याचा आग्रह : प्रशासनाशी चर्चा

Archana Banage

महाविकास आघाडीची विकास पताका घेऊन धावली कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस

datta jadhav

सातारा : ‘त्या’ तारळेच्या वृद्ध कोरोनाबाधित रुग्णाला मिळाला बेड

Archana Banage

मोक्क्यातील फरार आरोपी सहा वर्षांनी जेरबंद

datta jadhav

कोल्हापूर : ‘झेडपी’तील कामकाज उद्यापासून पूर्ववत

Archana Banage