Tarun Bharat

पोस्टल कुस्ती स्पर्धेत चंद्रशेखर शिंदे यांना कांस्यपदक

औंध / वार्ताहर :

इंदिरा गांधी स्टेडियम नवी दिल्ली येथे झालेल्या 34 व्या अखिल भारतीय पोस्टल कुस्ती स्पर्धेत 79 किलो वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारात पोस्ट खात्यातील महाराष्ट्र सर्कलच्या चंद्रशेखर सर्जेराव शिंदे यांनी कांस्यपदक पटकावले.

केंद्र शासनाच्या 25 वर्षाच्या सेवेत खात्याअंतर्गत स्पर्धेत तब्बल 25 वे पदक मिळवून त्यांनी एक अनोखा विक्रम रचला आहे. शिंदे मूळचे वाई तालुक्यातील पांडेवाडीचे आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे वरीष्ठ उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांचे सुपूत्र आहेत.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक अधिकारी व सोशल मीडिया टीमचे मार्गदर्शक, भारतीय शैली कुस्ती महासंघाचे सहसचिव आणि सुमो फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांच्या यशाबद्दल कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा.शरद पवार, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, वरिष्ठ उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

मानस धामणेचा पराभव

Patil_p

राष्ट्रध्वजाच्या विक्रीमुळे पालिकेच्या तिजोरीत वाढ

Patil_p

गत महिन्यात मृत्यूदर अर्ध्या टक्क्यांवर

datta jadhav

इंडोनेशियाच्या तीन बॅडमिंटनपटूंवर आजीवन बंदी

Patil_p

कराडच्या मुख्याधिकाऱ्यांची चोवीस तासात माघार; रोज दोन वेळा होणार पाणीपुरवठा

datta jadhav

द. आफ्रिकेविरुद्ध नेतृत्वासाठी धवन-पंडय़ा शर्यतीत

Patil_p