Tarun Bharat

पोस्ट ऑफिसमधून मिळणार बँक खात्यातील आधारव्दारे पैसे

Advertisements

कोल्हापूर/प्रतिनिधी

आता आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून आपल्या कोणत्याही बँकेतील खात्यामधून आधारव्दारे पैसे काढण्याची विनामूल्य सुविधा भारतीय डाक विभागाने जनतेसाठी उपलब्ध करुन दिली असून जिल्हयातील 567 पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती कोल्हापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी आज येथे बोलताना दिली.

भारतीय डाक विभागाच्यावतीने इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेमार्फत ही आधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगून प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील म्हणाले की, आता डाकघरामध्ये सर्व बॅकाचे व्यवहार आधार नंबरव्दारे विनामूल्य होणारअसून पोस्ट ऑफिसव्दारा दिनांक 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2020 रोजी सर्व पोस्ट ऑफिसमध्ये भव्य महामेळावा आयोजित केला आहे.

पोस्टाच्या या नव्या सुविधेमुळे पगार झाला पण एटीएम जवळ नाही ?, जवळ पैसे काढण्याची सुविधा नाही ?, एटीएम मशीनमध्ये पैसे संपलेत?, एटीएम कार्ड जवळ नाही ?,एटीएमला खूप गर्दी आहे ?, या सर्व अडचणी आता पोस्टाच्या या नव्या सुविधेमुळे दूर होणार आहेत. आता जवळच्या पोस्ट ऑफिसमधून आपल्या कोणत्याही बँकेतील खात्यामधून आधारव्दारे पैसे काढू शकता, यासाठी कोणताही चार्ज आकारला जाणार नाही, तरी जिल्हयातील जनतेने पोस्टाने सुरु केलेल्या या आधुनिक सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रवर अधिक्षक  पाटील यांनी केले आहे.

Related Stories

कामगार हक्काचे संरक्षण व विविध मागण्यांसाठी सर्व कामगार संघटनांच्या वतीने देशव्यापी निदर्शने

Abhijeet Shinde

बिडी कॉलनीत पाण्यासाठी धावाधाव

Abhijeet Shinde

८0 कोटी रुपये दूध दर फरक दिवाळीपूर्वी देणार : गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे

Abhijeet Shinde

कोल्हापूर विभागाचा बारावीचा निकाल ९५.७ टक्के

Abhijeet Shinde

ऑक्सिजन संशोधक डॉ. भालचंद्र काकडे यांचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : विजेच्या धक्क्याने सांगरुळातील तरुणाचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!