Tarun Bharat

पोस्ट ऑफीसतर्फे रेव्हेन्यू स्टॅम्पचे वितरण पुन्हा सुरू

प्रतिनिधी/ बेळगाव

मागील अनेक वर्षांपासून बंद करण्यात आलेले रेव्हेन्यू स्टॅम्पचे वितरण कर्नाटक पोस्ट विभागाने पुन्हा सुरू केले आहे. यामुळे महसुलासंबंधीच्या सर्व कामांसाठी आता हा स्टॅम्प उपलब्ध होणार आहे. जवळच्या कोणत्याही पोस्ट कार्यालयात अवघ्या 1 रुपयामध्येही हा स्टॅम्प मिळणार आहे. त्यामुळे मध्यंतरी स्टॅम्प बंद असल्याने बाहेरून आणून अधिक दराने विक्री करणाऱयांना चाप बसणार आहे.

अब्दुल करीम तेलगी याच्या तेलगी स्टॅम्प घोटाळय़ामुळे कर्नाटक पोस्टल विभागाने रेव्हेन्यू स्टॅम्पचे वितरण थांबविले होते. या घोटाळय़ामुळे कर्नाटक पोस्टल विभागाला मोठा फटका बसला होता. स्टॅम्प बंद असल्याचा फायदा घेत काही जण महाराष्ट्रातून स्टॅम्प आणून या ठिकाणी 5 ते 10 रुपयांना विक्री करीत होते. याचा फटका सर्वसामान्यांना बसत होता. 1 रुपयाचा स्टॅम्प अधिक दराने विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी वारंवार घडत होत्या.

जमीन खरेदी-विक्री, कोर्टासंबंधीची कागदपत्रे, कर्ज, करारपत्र, पगार वितरण, बँक व्यवहार, इन्शुरन्सशी संबंधित कागदपत्रांसाठी रेव्हेन्यू स्टॅम्प आवश्यक असतो. त्याची किंमत 1 रुपया असली तरी त्या ठिकाणी दस्तऐवज तयार होत नाहीत. त्यामुळे या स्टॅम्पला मोठी मागणी असते.

पी. एस. कलपत्री (साहाय्यक पोस्टमास्तर)

मागील काही वर्षांपासून पोस्ट विभागाने स्टॅम्प विक्री बंद केली होती. या महिन्यापासून बेळगाव विभागातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये पुन्हा विक्री सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना जवळच्या पोस्ट कार्यालयात हे स्टॅम्प उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Related Stories

अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

mithun mane

250 रुपयांचा वाद बेतला जीवावर

Amit Kulkarni

नित्यानंद कोटियन मि. कर्नाटक श्री किताबाचा मानकरी

Amit Kulkarni

मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये वसुंधरा दिन साजरा

Amit Kulkarni

शहराचा पारा घसरला 16.2 अंशांवर!

Amit Kulkarni

निपाणीच्या वेशीवर कोरोना, सतर्क रहा

tarunbharat