Tarun Bharat

पौराणिक मालिकांवर कलर्सचा भर

कोरोनामुळे सध्या सोशल डिस्टन्सिंग आणि घरातच राहणे गरजेचे आहे. यामुळे नाऊमेद वाटणे आणि भावनिक निराशा येऊ शकते. पण मनोरंजन ही गोष्ट अशी आहे की ती तुमच्या भावना बदलविण्यासाठी आणि तुमचे लक्ष त्यापासून दूर करू शकते. कलर्सने या विलगीकरणाच्या दिवसांदरम्यान पौराणिक मालिकांवर भर देण्याचे ठरविले आहे.

ऍक्शन आणि कॉमिक रिऍलिटी शो खतरों के खिलाडीच्या सर्वात लोकप्रिय सीझनचे पुन:प्रदर्शन आणि खतरा खतरा खतरा शो सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. प्रेक्षकांसाठी कलर्स वाहिनी पौराणिकतेला समर्पित मालिका महाकाली आणि राम सिया के लव कुश संध्याकाळी 4 ते 6 दरम्यान दररोज दाखविणार आहे. प्राईम टाईमच्या शोमध्ये छोटी सरदारनी, शक्ती… अस्तित्व के एहसास की, बॅरिस्टर बाबू, विद्या आणि बिग बॉस सीझन 13 संध्याकाळी 7 ते रात्री 11 च्या दरम्यान प्रदर्शित केले जाणार आहेत. यातील प्रत्येक शो प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त आस्वाद घेता यावा म्हणून एक तासाच्या स्लॉटमध्ये दाखविले जाणार आहेत. वीपेंडला कॉमेडी नाईट विथ कपिल प्रसारित होणार आहे. वायकॉम 18 च्या, हिंदी मास एंटरटेनमेंटच्या चिफ कंटेंट ऑफिसर, मनीषा शर्मा, म्हणाल्या, “संपूर्ण देशभरात चालू असलेल्या लॉकडाऊन मुळे, टेलिव्हिजनचा लँडस्केप लक्षणीयरीत्या बदलत आहे. बंधनामुळे कोणतेही नवीन किंवा दररोजचे कार्यक्रम प्रसारित होऊ शकत नाहीत, त्यामुळे प्रेक्षक मनोरंजनाचे पर्याय शोधू लागले आहेत आणि नॉन प्राईम टाईमला गती मिळाली आहे. लोक घरात बसून आहेत आणि कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. म्हणून आम्ही जाणीवपूर्वक पौराणिक मालिका दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. आव्हानात्मक काळामध्ये, कलर्स प्रेक्षकांच्या संपूर्ण मनोरंजनासाठी काळजीपूर्वक तयार केलेल्या शोच्या मिश्रणातून त्यांच्याशी संपर्क साधत आहे.

Related Stories

आगामी चित्रपटात सुबोध भावे पहिल्यांदाच साकारणार हटके भूमिका

Abhijeet Khandekar

नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यविरोधात गुन्हा

Archana Banage

‘सूप’ सीरिजमध्ये मनोज वाजपेयी

Patil_p

राधिकाच्या ‘शिद्दत’चा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p

‘आदिपुरुष’च्या चित्रिकरणास मुंबईत प्रारंभ

Patil_p

विजय-अनन्याच्या ‘लाइगर’चा टीझर सादर

Patil_p