Tarun Bharat

प्रकल्पांना विरोध करणाऱया एनजीओंशी चर्चा करा

Advertisements

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्योग संघटनांना आवाहन

प्रतिनिधी/ पणजी

सर्वांनाच काही सरकारी नोकरी देऊ शकणार नाही मात्र युवकांना विविध प्रकारच्या प्रशिक्षणाची सोय करण्यास सरकार सज्ज आहे. जेणेकरुन इथे रोजगार संधी उपलब्ध होईल, असे निवेदन करुन काही एनजीओ संस्था या सरकारच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करीत आहेत. सरकारच नव्हे तर गोव्यातील उद्योग संघटनांनी पुढाकार घेऊन अशा एनजीओंशी चर्चा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्स संघटनेच्या 114व्या आमसभेत बोलताना डॉ. सावंत यांनी गोवा उद्योग क्षेत्रात तसेच विविध सार्वजनिक प्रकल्प व योजनांमध्ये देशात पुढे आहे. उद्योगांसाठी गोवा सरकार विविध प्रकल्प राबविण्यास तयार आहे. उद्योजकांनी तसेच उद्योग संघटनेने सरकारबरोबर हात मिळवणी करुन या राज्याच्या विकासात महत्त्वाची कामगिरी बजवावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

उद्योग वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

गोव्यातील अनेक सार्वजनिक प्रकल्पांना विरोध करणाऱया काही सेवाभावी संघटनांमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब लागले. शिवाय आर्थिकदृष्टय़ा बराच फटका बसल्याचे ते म्हणाले. अनेक उद्योगांना या संघटना विरोध करतात यातून नव्याने होणाऱया रोजगारावर देखील विपरीत परिणाम होतो. आम्ही अशा सेवाभावी संघटनांशी चर्चा करण्यास तयार आहोत. उद्योग संघटनेने देखील पुढाकार घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी. राज्यातील उद्योग वाढीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी योवेळी उद्योजकांनी दिले.

उद्योजक आणि सरकारने परस्पर भागिदारीमध्ये काही प्रकल्प सुरु करणे आवश्यक आहे. गोवा सरकारने आपला पीपीपी विभाग पुन्हा एकदा कार्यरत केलेला आहे व त्याद्वारे आम्ही अनेक प्रकल्प उभारले जातील, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी जाहीर केले.

उद्योगमंत्री माविन गुदिन्हो आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे हे देखील यावेळी उपस्थित होते.

Related Stories

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची केंद्र सरकारच्या खाते प्रमुखांशी चर्चा

Amit Kulkarni

नव्या नेतृत्वाखाली काँग्रेस गुरुडझेप घेईल

Amit Kulkarni

केवळ भाजपमुळेच गोव्याची अर्थव्यवस्था ढासळली – राहुल गांधी

Sumit Tambekar

भीषण अपघातात पेडणेतील पती-पत्नी ठार

Omkar B

आज गडगडाटासह पावसाची शक्यता

Patil_p

अत्यावश्यक सेवांसाठी प्रयत्नशील

Amit Kulkarni
error: Content is protected !!