Tarun Bharat

प्रकाश लॉजचा दर्शनी भाग कोसळला

तिघे किरकोळ जखमी पहाटे 3 वाजता घडली घटना अन्य इमारतींना धोका निर्माण

प्रतिनिधी / पणजी

राजधानीतील आझाद मैदानाशेजारी असलेल्या पोर्तुगिजकालीन प्रकाश लॉज नामक इमारतीचा दर्शनी भाग रविवारी पहाटे कोसळला. त्या इमारतीत राहणारे तिघेजण किरकोळ जखमी झाले. या घटनेमुळे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा लॉजचे मालक दत्ताराम साखळकर यांनी केला आहे.

अग्निशामक दलास माहिती मिळताच त्यांनी तेथे धाव घेऊन अडकलेल्यांची सुटका केली. लॉजच्या खालील भागात असलेले हॉटेल व झेरोक्स दुकानाचाही भाग कोसळला. हा भाग कोसळल्याने त्याच्या शेजारील रितू कुमार व अन्य काही दुकाने, आस्थापनांना धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन सांगितले की, अशा धोकादायक इमारतींची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. त्यासाठी कायदेशीर उपाय काढण्याची गरज आहे. इमारतीचे मालक दुरुस्ती करण्यास टाळाटाळ करतात. अनेक भाडेकरू अशा इमारतींच्या तक्रारी घेऊन येतात, पण मनपा काही करू शकत नाही. त्यासाठी संबंधित मालकांचे सहकार्य हवे. त्यांनी इमारतीची देखभाल करावी. त्यांना मनपा परवाने देऊ शकते, असे मडकईकर म्हणाले.

Related Stories

मालपे येथे मालवाहू कंटेरला अपघात कंटेरचा दर्शनी भाग दरीत कोसळला

Amit Kulkarni

शॅक व्यवसाय ऑक्टोबरपासून सुरू करण्याची सरकारची तयारी

Patil_p

वाढीव पाणीबिलांमुळे संतप्त दवर्लीवासियांकडून घेराव

Amit Kulkarni

पहिल्याच पावसात छपराच्या ‘पीओपी’चे तुकडे पडण्याचे प्रकार

Amit Kulkarni

पणजी-फोंडा मार्गावर बर्निंग बसचा थरार..

Abhijeet Khandekar

मयेतील युवानेते प्रेमेंद्र शेट आज करणार मगो पक्षात प्रवेश

Amit Kulkarni