Tarun Bharat

प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. अग्रवाल यांचे निधन

कोरोना संक्रमणामुळे ओढवला मृत्यू

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पद्मश्रीने सन्मानित प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. के.के. अग्रवाल यांचे कोरोना संक्रमणामुळे निधन झाले आहे. निधनासमयी ते 62 वर्षांचे हेते. इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अग्रवाल यांना मागील आठवडय़ात एम्समध्ये दाखल करण्यात आले होते आणि ते व्हेंटिलेटरवर होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अग्रवाल यांच्या निधनामुळे संपूर्ण देशाचे मोठे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे.

अग्रवाल यांनी जीवनभर गरीब, वंचितांच्या आरोग्य अधिकारांसाठी काम केले असे उद्गार त्यांनी काढले आहेत. कोरोनाशी दीर्घ लढाई लढल्यावर सोमवारी रात्री साडे अकरा वाजता अग्रवाल यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. जागतिक महामारीच्या काळातही अग्रवाल यांनी लोकांना शिक्षित करण्याचे प्रयत्न सातत्याने केले, ते अनेक व्हिडिओ तसेच शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे सुमारे 10 कोटी लोकांपर्यंत पोहोचले आणि अनेक लोकांचा जीव वाचविला.

अग्रवाल यांना 2010 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच त्यांना डॉ. बी.सी. रॉय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. हाताने सीपीआर देऊन जीवनरक्षक तंत्रज्ञानात अधिकाधिक लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी अग्रवाल यांचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदले गेले होते.

Related Stories

जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षा वेळेतच होणार

Archana Banage

पंजाबमध्ये व्हीव्हीआयपींना पुन्हा सुरक्षा बहाल

Patil_p

टेस्लाने विकल्या 70 हजार गाड्य़ा

Patil_p

उत्तराखंडात 424 नवे कोरोना रुग्ण; 4 मृत्यू

Tousif Mujawar

…तर भारतात दिवसाला 14 लाख कोरोना रुग्ण आढळतील

datta jadhav

कोरोना पॉझिटिव्ह असलेले उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा रुग्णालयात दाखल

Tousif Mujawar