Tarun Bharat

प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांचा विक्रम

Advertisements

२५ एकरमध्ये ५० खंडी भात पिकवण्याचा उच्चांक

खेड / प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटांवर मात करून तालुक्यातील कुडोशी येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी भात पिकाचा कोकणात विक्रम करत आपल्या २५ एकर शेतीत जवळपास ५० खंडी भाताचे उत्पादन घेऊन उच्चांक निर्माण केला आहे. त्यांचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.

कोकणातील शेती ही अत्यंत खर्चिक व शेतीसाठी माणसे न मिळत नसल्याने कोकणातील शेतकरी,शेतीकडे दुर्लक्ष करीत असताना गेल्या ५ वर्षांपासून श्री सदानंद कदम हे कोकणात वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या शेती उत्पादनाचे उच्चांक निर्माण करून स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत आहे. २०२० हे वर्ष तसा देश विदेशातील अनेक संकटामुळे आर्थिकही अडचणींचा ठरला. मात्र, सदानंद कदम अग्रेसर ठरत त्यांनी कुडोशी व वेरळ येथील शेतात जवळपास २५ ते ३० एकर शेतीमध्ये ५० खंडी भाताचे उत्पादन घेऊन कोकणातील इतक्या मोठ्या प्रमाणात भात उत्पादन करणारा एकमेव शेतकरी म्हणून विक्रम केला आहे.

Related Stories

जिल्हा बँकेसाठी 982 मतदार निश्चित

NIKHIL_N

पालकमंत्र्यांच्या मुंबईतील बैठकीला 22 अधिकाऱयांची दांडी!

Patil_p

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार

Patil_p

‘डीबीएल,’ ‘आरटी फॅक्ट’ हायवे कंपनीवर कारवाई!

NIKHIL_N

मालवणात शिवसेनेतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

NIKHIL_N

रेल्वे कामगार नेत्यास कोविड बाधा झाल्याने कर्मचारी हादरले

Patil_p
error: Content is protected !!