Tarun Bharat

प्रचारात आ. शशिकांत शिंदेचा धडाका

वायसी, एलबीएस, यशोदा कॉलेजवर दिल्या भेटी

प्रतिनिधी/ सातारा

राष्ट्रवादी पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिक्षक व पदवीधर निवडणूकीसाठी प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे. कॉलेजवर भेटी देवून प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधत आहेत. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे नरेंद्र पाटील, कॉग्रेसचे डॉ. सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष सुनील माने, तेजस शिंदे, प्राचार्य प्रतिभा गायकवाड, व मान्यवर उपस्थित होते.

        1 डिसेंबर रोजी शिक्षक व पदवीधर निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. अवघे पाच दिवस शिल्लक असल्याने सर्वत्र प्रचाराचा वेग वाढला आहे. सर्वच उमेदवार प्रचारांच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत तासगावकर व पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरूण आण्णा लाड यांचा प्रचार आमदार शशिकांत शिंदे करत आहेत. मंगळवारी त्यांनी यशवंतराव चव्हाण ऑफ सायन्स कॉलेज सातारा, लाल बहादूर शास्त्राr कॉलेज, यशोदा कॉलेज येथे भेट दिली.

 यावेळी आ. शशिकांत शिंदे म्हणाल्या, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या मार्गदर्शन नेहमी उमेदवारांना लढण्याची ताकद देते. फक्त निवडणूकीचा प्रचार न करता शिक्षक व पदवीधरांच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य देत आहे. हे दोन्ही उमेदवार इतर पक्षाच्या उमेदवारांवर भारी पडणार आहेत. त्यांना या निवडणूकीच्या माध्यमातून तुमचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करून दाखवण्यासाठी तुमचा पाठिंबा आवश्यक आहे. यासाठी  दोन्ही उमेदवारांना मतदान करून निवडून द्या. त्यांच्या या आवाहनाला कॉलेज मधील प्राचार्य, प्राध्यापक यांनी प्रतिसाद दिला.

Related Stories

Dasara Melava : एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांनी सोडलं मैदान

Archana Banage

मलिकांच्या खात्यांचा पदभार राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांकडे

datta jadhav

हॅपी प्रपोज डे म्हणत व्यक्त झाल्या मनातल्या भावना

Patil_p

मुंबई मनपासह स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हीच जिंकणार

datta jadhav

”अफगाणिस्तान दहशतीमागे दोन भारतीयांचा हात ?”

Archana Banage

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर NCB च्या ताब्यात

Tousif Mujawar