Tarun Bharat

प्रचारादरम्यान उमेदवाराने धुतले कपडे

तामिळनाडूतील प्रकार- वॉशिंग मशीन देण्याचे आश्वासन

वृत्तसंस्था/ चेन्नई

मतदारांना आकर्षित करण्यासाठी कुठल्या प्रकारची आश्वासन देतात याचे उदाहरण तामिळनाडूत दिसून आले आहे. राज्यात सत्तारुढ असलेल्या अण्णाद्रमुकचे नागपट्टिणम मतदारसंघातील उमेदवार थांगा कातिरवन यांनी प्रचारादरम्यान कपडेच धुतले आहेत. याचबरोबर विजयानंतर लोकांना वॉशिंग मशीन देण्याचे आश्वासन दिले आहे.

वृत्तसंस्था एएनआयने याची एक चित्रफित शेअर केली आहे. राज्यात एकाच टप्प्यात 234 जागांकरता 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. राज्यात द्रमुकने काँग्रेस तसेच अन्य छोटय़ा पक्षांसोबत आघाडी केली आहे. तर अण्णाद्रमुक आणि भाजप यांच्यात निवडणुकीकरता आघाडी आहे.

कमल हासन यांच्या वाहनाची तपासणी

निवडणूक भरारी पथकाने तंजावर जिल्हय़ात मक्कल निधि मय्यमचे प्रमुख कमल हासन यांच्या वाहनाची झडती घेतली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी हासन एका सभेसाठी त्रिचीच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला आहे. त्यांच्या पक्षाने 154 उमेदवार उभे केले आहेत. तर उर्वरित 80 जागांमध्ये दोन सहकारी पक्ष निवडणूक लढवत आहेत.

Related Stories

हिमाचल प्रदेश : दरीत कोसळली एचआरटीसी बस; 6 जण गंभीर जखमी

Tousif Mujawar

देशात कोरोनाच्या 230 प्रकारांची पुष्टी

datta jadhav

1.19 लाख कोटींचा प्राप्तीकर परतावा

Patil_p

जून अखेरीस येणार कोरोनाची चौथी लाट

Patil_p

मुंबईनंतर दिल्लीतही हजारो मजूर रस्त्यावर

prashant_c

चीन सीमेवर भारत-अमेरिकेचा युद्धाभ्यास

Patil_p