Tarun Bharat

प्रजासत्ताकदिनी कॉलेजमध्ये होणार सूर्यनमस्कार

युजीसीची विद्यापीठ-कॉलेजना सूचना : 75 कोटी सूर्यनमस्कारांचा अंदाज

प्रतिनिधी /बेळगाव

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यापीठ-कॉलेजस्तरावर सूर्यनमस्कार घातले जाणार आहेत. प्रत्येक विद्यापीठ व कॉलेजने हा उपक्रम राबवावा, अशी सूचना युजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग) ने केली आहे. द नॅशनल योगासना स्पोर्ट्स फेडरेशन व आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने प्रजासत्ताक दिनी हा उपक्रम राबविला जाणार आहे. आजादी का अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत 30 राज्यांमधील 30 हजार शिक्षण संस्थांमधील 3 लाख विद्यार्थी 75 कोटी सूर्यनमस्कार घालतील, असा अंदाज आहे.

विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, या उद्देशाने राज्य सरकारने हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही पदवीपूर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उपक्रमही सुरू केला आहे. प्रजासत्ताक दिनासाठी नियमावलीही तयार करण्यात आली आहे. ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 9.30 पूर्वी संपवून त्यानंतर सूर्यनमस्काराचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कोरोनाचे प्रमाण वाढल्यास ऑनलाईन अथवा ऑफलाईन हा उपक्रम होणार आहे. आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना कलात्मक उपक्रमही दिला जाऊ शकतो. सीमेवरील जवानांना पाठविण्यासाठी कलात्मक वस्तू तयार केल्या जाणार आहेत.

वाद निर्माण होण्याची शक्यता

युजीसीने जरी या सूचना केल्या असल्या तरी यामुळे वादाची ठिणगी पडू शकते. यापूर्वी शाळा व पीयू कॉलेजसाठी अशाच प्रकारचा आदेश डिसेंबर 2021 मध्ये काढण्यात आला होता. परंतु या निर्णयाला विरोध झाला होता. शैक्षणिक संस्थांमधील ‘भगवेकरण’ बंद करा, अशी मागणी करण्यात आली होती. आता महाविद्यालयांमध्ये सूर्यनमस्कार घातले जाणार असल्याने हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

Related Stories

वक्फ बोर्डच्या मागणीसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

mithun mane

साखर आयुक्तांकडून एफआरपी दर जाहीर

Patil_p

माळमारुती पोलीस निरीक्षकांचे काम उत्तमच

Amit Kulkarni

श्रमिक अभिवृद्धी संघातर्फे नरेगा कामगारांचा मेळावा

Amit Kulkarni

बेळगाव-सौंदत्ती मार्गावर विशेष बससेवा

Patil_p

मंगला अंगडी यांना भाजपची उमेदवारी

Omkar B