Tarun Bharat

प्रजासत्ताकदिनी मोदींचा रस्ता पुन्हा अडवणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंजाबच्या फिरोजपूरमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा त्रुटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने माजी न्या. इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या इंदू मल्होत्रा यांना शीख फॉर जस्टिस संघटनेकडून धमकीचा फोन आला आहे. मल्होत्रा यांना या प्रकरणाचा तपास करु देणार नाही. प्रजासत्ताक दिनी मोदींचा रस्ता पुन्हा अडवणार आहे, असे सांगत या समितीतील वकिलांनाही धमकवण्यात आले आहे.

मोदी सुरक्षेतील त्रुटींसंदर्भात माजी न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांना चौकशी करु देणार नाही. तसेच 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींचा रस्ता पुन्हा अडवणार आहे. त्यांना राजपथावर जाऊ देणार नाही, अशी धमकी शीख फार जस्टीसने दिली आहे. तसेच या समितीतील वकीलांनाही धमकावण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सर गंगाराम रुग्णालयात दाखल; डॉक्टर म्हणाले – प्रकृती स्थिर

Tousif Mujawar

लॉक डाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी युपीचे आमदार अमन मणि त्रिपाठी यांच्या सह 7 जणांना अटक

Tousif Mujawar

भारत जोडो यात्रेत काँग्रेस खासदाराचा मृत्यू

Patil_p

नोरा फतेहीने दाखवले पर्सनल चॅट, चौकशीत सांगितले BMW कार ऑफर केली होती पण…

Archana Banage

दोन मिनिटात 2 लाखाच्या कर्जाची पेटीएमची योजना

Omkar B

राष्ट्रवादीला जेरीस आणण्यासाठी देशमुख,मलिकांना अटक-जयंत पाटील

Archana Banage