Tarun Bharat

प्रज्ञा सातव यांच्यासाठी बाळासाहेब थोरात देवेंद्र फडणवीस यांना भेटले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

कोल्हापूर / प्रतिनिधी

हिंगोली विधानपरिषद निवडणुकी बाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मोठ वक्तव्य केलं आहे. दिवंगत कॉंग्रेस नेते राजू सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्यासाठी बाळासाहेब थोरात, आणि अनिल परब, देवेंद्र फडणवीस यांना भेटले, या भेटीत बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक बिनविरोध करण्याबाबत फडणवीस यांना विनंती केल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं.

याच बरोवर कोल्हापूर विधानपरिषदे मतदारसंघाबाबत बोलताना आम्ही केंद्राशी बोलून याबाबत निर्णय घेऊ कोल्हापूर विधानपरिषदेची जागाही जिंकू असा विश्वास चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. ज्या पक्षाचे सतेज पाटील उमेदवार आहेत त्या पक्षांची फक्त 36 मते आहेत या मतातील फरक आम्ही भरून काढू असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

Related Stories

मंत्री यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांची शिक्षा

Tousif Mujawar

KOLHAPUR-वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा भोगावती नदीत बुडुन मृत्यु, कुरुकलीतील घटना

Rahul Gadkar

धक्कादायक..! १९ वर्षीय युवती गांजा विक्रीच्या रॅकेटची प्रमुख

Abhijeet Khandekar

इचलकरंजीत तीन पानी जुगार अड्यावर छापा, २७ जण अटकेत

Archana Banage

राज्यातील 32 कारखान्यांना 516 कोटींची थकहमी

Patil_p

महाराष्ट्र : 3,880 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Tousif Mujawar