Tarun Bharat

प्रज्नेश गुणेश्वरन पराभूत

वृत्तसंस्था/ मेलबर्न

ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी सुरू असलेल्या पात्रता स्पर्धेत भारताच्या प्रज्नेश गुणेश्वरनचे आव्हान दुसऱया फेरीतच समाप्त झाल्याने त्याची मुख्य ड्रॉमध्ये खेळण्याची संधी हुकली आहे. जर्मनीच्या मॅक्सिमिलियन मार्टेररकडून त्याला पराभव स्वीकारावा लागला

प्रज्नेशपेक्षा सर्व्हिस व ताकदीचे फटके मारण्यात सरस असणारा मार्टेरर जागतिक क्रमवारीत त्याच्यापेक्षा सात क्रमांकाने मागे (228) आहे. मार्टेररने ही लढत 6-2, 7-6 (10-8) अशा फरकाने जिंकली. सुमारे दीड तास ही लढत रंगली होती. आता फक्त युकी भांब्री हा एकमेव भारतीय पात्रता फेरीत बाकी आहे. रामकुमार रामनाथन व अंकिता रैना यांना याआधीच पराभव स्वीकारावा लागला आहे.

Related Stories

अमिरात किंवा लंकेत आयपीएल स्पर्धा होवू शकते : गावसकर

Patil_p

यजमान पाकची पहिल्या डावात घसरगुंडी

Patil_p

भारतीय फलंदाजांच्या मार्गदर्शनासाठी द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवावे : वेंगसरकर

Patil_p

सानिया मिर्झाचे पुनरागमन विजयाने

Patil_p

अविनाश साबळे, प्रियांका गोस्वामीला रौप्य

Patil_p

विंडीजचा कसोटी संघ जाहीर

Amit Kulkarni