Tarun Bharat

प्रणय वर्मा भारताचे बांगलादेशमधील राजदूत

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

प्रशासकीय अधिकारी प्रणय वर्मा यांची शुक्रवारी बांगलादेशमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागिदारी लक्षात घेता ही नियुक्ती अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. वर्मा हे भारतीय परराष्ट्र सेवेचे 1994 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते सध्या व्हिएतनाममध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत. ते विक्रम दोराईस्वामी यांची जागा घेतील. दोराईस्वामी ब्रिटनमधील भारतीय राजदूत म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्त गायत्री इस्सार कुमार 30 जून रोजी निवृत्त झाल्याने राजदुतांच्या जबाबदारीत बदल करण्यात आला आहे.

Related Stories

बारामुल्ला येथील चकमकीत लष्करी अधिकारी जखमी

datta jadhav

जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी डॉ. हर्षवर्धन

Patil_p

”…मग हवं तर मन की बात पण करा”; राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका

Archana Banage

गॅसदराचा पुन्हा चटका

Patil_p

भाजपच्या गुजरात प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

datta jadhav

“कधी काळी शरद पवारांसाठी काम करणारे मोदी आज देशाचे पंतप्रधान”

Archana Banage
error: Content is protected !!