Tarun Bharat

प्रणव मुखर्जींच्या पुत्राचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

Advertisements

कोलकाता / वृत्तसंस्था

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. येथील मुख्यालयातील कार्यक्रमात तृणमूलचे नेते पार्थ चटर्जी आणि लोकसभा खासदार सुदिप बंडोपाध्याय यांनी त्यांचे स्वागत केले. काँग्रेसमध्ये प्राथमिक सभासद वगळता मला कोणत्याही गटामध्ये सामील करण्यात आले नव्हते. त्यामुळेच मी तृणमूल काँग्रेसमध्ये सैनिक म्हणून रुजू झालो आहे. भविष्यात पक्षाच्या सूचनांनुसार काम करत अखंडता आणि धर्मनिरपेक्षता राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिजित मुखर्जी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर स्पष्ट केले.

अभिजित मुखर्जी यांनी 2012 आणि 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर बंगालमधील जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून जिंकली होती. काँग्रेसने त्यांना या जागेवरुन 2019 मध्येही तिकीट दिले, पण त्यांचा पराभव झाला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरेच नेते तृणमूलमध्ये सामील होत आहेत. नुकतेच मुकुल रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ आता अभिजित मुखर्जीही तृणमूलमध्ये दाखल झाल्याने तृणमूल काँग्रेसचे बळ आणखीनच वाढले आहे.

Related Stories

मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅकवरुन काँग्रेसचा केंद्र सरकारला गंभीर सवाल; म्हणाले…!”

Abhijeet Shinde

आपत्कालीन स्थितीत खासगीत उपचाराची सुविधा

Patil_p

आठ राज्यांना मिळणार नवे राज्यपाल

datta jadhav

बंडखोर नेत्यांची कार्यालये टार्गेट

Patil_p

‘यांना’ संपवण्यासाठीच राजकारणात: योगी आदित्यनाथ

Abhijeet Shinde

ज्योतिरादित्य सिंदिया यांनी पदभार स्वीकारला

Patil_p
error: Content is protected !!