Tarun Bharat

प्रणव मुखर्जी पंचत्वात विलीन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर आज लोधी स्मशान घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे एसओपीअंतर्गत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुखर्जी यांचे कुटुंबीय पीपीई किट घालून उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक दिग्गजांनी मुखर्जी यांच्या 10 राजाजी मार्ग येथील निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुखर्जी हे माजी राष्ट्रपती तसेच केंद्र सरकारमध्ये वित्त, संरक्षण, परराष्ट्र आणि महत्वपूर्ण खाती सांभाळली. मुखर्जी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत हा दुखवटा पाळण्यात येणार आहे.

9 ऑगस्टला मुखर्जी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.  त्यानंतर 10 ऑगस्टला त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली. 20 ते 21 दिवसांपासून ते दीर्घ कोमात होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

Related Stories

दिशा रवीला 1 दिवसाची पोलीस कोठडी

Patil_p

चीनने बळकावली नेपाळची 33 हेक्टर जमीन

datta jadhav

सायरस मिस्त्रीना धक्का : एनसीएलएटीच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

prashant_c

…तर जालन्यातून निवडणूक लढवू- इम्तियाज जलील

Archana Banage

राऊत शरीराने शिवसेनेत अन् मनाने राष्ट्रवादीत; केसरकारांचा हल्लाबोल

Archana Banage

मतदान करण्यासाठी ‘तिचा’ मुलगा आला थेट अमेरिकेतून गावी

Anuja Kudatarkar