Tarun Bharat

प्रतापसिंह हायस्कूलला भौतिक सुविधा तत्काळ द्या

जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या सुचना

प्रतिनिधी/ सातारा

प्रतापसिंह हायस्कूल हे महान व्यक्ती घडवणारे ज्ञानालय आहे. याच ज्ञानालयाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. शाळेला ज्या भौतिक सुविधांची कमतरता आहे त्या दुर करण्यासाठी बांधकाम विभागाने प्राधान्य द्यावे, अशा सुचना जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी दिल्या. दरम्यान, शाळा समितीची सभा घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, रवींद्र खंदारे, सयाजीराव विद्यालयाचे प्राचार्य जाधव, कार्यकारी अभियंता प्रतिनिधी राजकुमार शिंदे या सदस्यांनी शाळेची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. मानसिंगराव जगदाळे म्हणाले, या शाळेत अनेक थोर व्यक्ती शिकून भारतास मोठे केले आहे. त्यामुळे या शाळेचे जतन अत्यंत चांगल्या प्रकारे होणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा परिषद चांगल्या प्रकारे सहकार्य करेल, असे प्रतिपादन केले.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी प्रतापसिंह हायस्कूलला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सर्व प्रकारचे सहाय्य केले जाईल. शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आंतरिक मनाने प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात समृद्ध बनविण्यासाठी शाळेत देत असलेल्या व्यावसायिक शिक्षणाचे कौतुक केले. दहावीचा निकाल उत्कृष्ट लागण्यासाठी सर्व शिक्षकांनी चांगले प्रयत्न करावेत. तसेच शाळेस ज्या ज्या भौतिक गरजा लागणर आहेत. त्याचे अंदाजपत्रक तयार करुन सादर करावे. या भौतिक गरजा पुढील आर्थिक वर्षात पूर्ण करुन देण्याचा प्रयत्न करु असे सांगून क्रिडांगण तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश दिले. नुतनीकरण केलेल्या वसतीगृहाच्या इमारतीची पाहणी केली. पाहणीमध्ये शाळैस कोणत्या भौतिक सुविधांची गरज आहे. याची तात्काळ सोडवणूक करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंत्यांना दिले. तसेच शाळा समिती सदस्यांनी शाळेतील सर्व वर्गाची तपासणी करुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी व शिक्षकांना गुणवत्ता वाढीसाठी योग्य ते मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी अंतरमनातून अद्यापन करुन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी असे सुचित केले. त्यानंतर शाळा समितीची सभा सुरु झाली. सभेत मुख्याद्यापक सन्मती देशमाने यांनी श्री.छ.प्रतापसिंह हायस्कूल विषयी संपूर्ण माहिती दिली. ही शाळा सातारा जिह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी शाळा असून या शाळेत यावषीं 200 वर्ष पुर्ण होत आहेत. या शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, उच्च न्यायालयाचे न्यायाधिश गजेंद्र गडकर, एलआयसीचे संस्थापक व्ही.जी.चिरमुले, औध संस्थानचे भगवानराव पंतप्रतिनिधी, कूपर उद्योग समुहाचे संस्थापक धनसीशॉ कुपर आदी थोर  व्यक्तींनी शिक्षण घेवून भारत समृद्ध करण्यास योगदान दिले असे सांगून प्रतापसिंह हायस्कूलच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा सादर केला. त्यानंतर शाळेच्या भौतिक सुधारणा विषयी सांगोपांग चर्चा करण्यात आली. त्यामध्ये क्रीडांगण, पिण्याच्या पाण्याची सुविधा प्रयोगशाळा आदी सुविधा त्वरीत उपलब्ध करुन देण्याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी निर्देश दिले.  यानंतर शाळेच्या शैक्षणिक प्रगतीस शुभेच्छा दिल्या. 

Related Stories

कुंभोजात आजपासून तीन दिवसांचा लॉकडाऊनला सुरुवात

Archana Banage

राज्यात ‘यलो अलर्ट’

datta jadhav

सातारा : थेट विक्रीमुळे कष्टकरी शेतकरी उद्योजक होईल : हणमंतराव शिंदे

Archana Banage

खेडमध्ये दोन वर्षानंतर जनावरांच्या कत्तलीची पुनरावृत्ती!

Patil_p

‘विरोधकांकडून राज्यात डबल ढोलकीचा डंका’

Archana Banage

नागठाणेत विवाहितेचा खून

datta jadhav