Tarun Bharat

प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या 11.35 कोटींच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. एनएसईएल घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून, ईडीने सरनाईक यांचे ठाण्यातील दोन फ्लॅट आणि जमीन जप्त केली आहे.

नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 25 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 3254 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. एनएसईएल प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास गुंतवणूकदारांना प्रवृत्त करण्यात आले. त्यानंतर बोगस वेअरहाऊस पावत्यांसारखी बनावट कागदपत्रे तयार केली, बनावट खाती तयार केली. अंदाजे 13000 गुंतवणूकदारांचे 5600 कोटी एनएसईएलच्या व्यापारी सदस्यांनी रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, थकीत कर्जाची परतफेड आणि इतर ठिकाणी वळवले होते. पीएमएलए अंतर्गत केलेल्या तपासणीत हे दिसून आले होते. एनएसईएल घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईत गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात आता ईडीने सरनाईक यांच्यावर कारवाई केली आहे.

ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. पण प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता. मात्र, आता ईडीने थेट सरनाईक यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.

Related Stories

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

datta jadhav

Pegasus Effect : सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोबाईल वापरांवरही निर्बंध; राज्य सरकारकडून नियमावली जारी

Archana Banage

समृद्धी महामार्गावर उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून १ ठार, २ जखमी

Archana Banage

आफ्रिकन ‘स्वाईन फ्लू’मुळे 13 हजार डुक्करांचा मृत्यू

datta jadhav

गुजरातमधील ‘या’ शहरात 21 मे पर्यंत कर्फ्यू

Tousif Mujawar

कोरोनिल : बाबा रामदेव यांच्यासह चौघांविरोधात FIR

datta jadhav