Tarun Bharat

प्रतिक्षा संपली!.. देशात 16 जानेवारीपासून लसीकरण

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

कोरोना लसीकरणाची प्रतिक्षा आता संपली असून, देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

कोरोना लसीकरणाबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला कॅबिनेट सचिव, प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मोदींनी या निर्णयासंदर्भात ट्विट केले.

पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांची संख्या अंदाजे तीन कोटी आहे. त्यानंतर 50 वर्षांवरील लोकांना आणि 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या गंभीर स्वरूपात आजारी असलेल्या लोकांना लस दिली जाईल. ही संख्या जवळपास 27 लाख आहे. 

लसीकरणासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल. लस पुरवठा, व्यवस्थापन प्रणाली, लस साठवण, तापमान, लाभार्थी यासंबंधी माहिती यामुळे संकलित करणे सोपे जाईल. 

Related Stories

केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

Archana Banage

पाकचाही चीनला दणका; ‘टिकटॉक’वर घातली बंदी

datta jadhav

मुन्ना खासदार झाल्याचा आनंद : राजू शेट्टी

Abhijeet Khandekar

देशात संसर्गवाढ धोकादायक पातळीवर

Patil_p

मुलाचे भांडण सोडवताना धक्काबुक्कीत वृद्धाचा मृत्यू

Abhijeet Khandekar

खासदार गावितांचा शिंदे गटात प्रवेश नाही- मुख्यमंत्री शिंदे

Archana Banage
error: Content is protected !!