Tarun Bharat

प्रत्यार्पणापासून वाचण्याचा मल्ल्यांचा प्रयत्न

लंडन

फरार उद्योजक विजय मल्ल्या यांनी ब्रिटनमध्ये वास्तव्य करू देण्याची अनुमती मिळावी याकरता तेथील गृहमंत्री प्रीति पटेल यांच्याकडे अर्ज केला आहे.  लंडनच्या उच्च न्यायालयात मल्ल्या यांच्या दिवाळखोरी संबंधी सुनावणी सुरू आहे. मल्ल्या सध्या जामिनावर बाहेर आहेत .

भारत सरकार 65 वर्षीय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे. सरकारी बँकांकडून कर्ज घेत 9 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप मल्ल्यांवर आहे. प्रत्यार्पणापासून वाचण्यासाठी मल्ल्या यांच्याकडे आता ब्रिटनच्या गृहमंत्र्यांकडे अर्ज करण्याव्यतिरिक्त कुठलाच पर्याय नव्हता.

मल्ल्यांनी दैनंदिन खर्चांसाटी स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेच्या विक्रीतून मिळालेली रक्कम मागितली आहे. ही मालमत्ता प्रेंच रिवेरापासून दूर अंतरावरील एका बेटावर आहे. याची किंमत सुमारे 30 कोटी रुपये आहे. ही रक्कम कोर्ट फंड्स ऑफिसकडे जमा आहे.

राजकीय आश्रयाची मागणी

मल्ल्यांनी ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात भारतात होणाऱया प्रत्यार्पणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळण्यात आली आहे. गृहमंत्री पटेल यांनी प्रत्यार्पणाच्या दस्तऐवजावर अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. तांत्रिक कारणास्तव स्वाक्षरीला विलंब होत असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून संगण्यात आले आहे. मल्ल्यांनी मानवाधिकारांचा दाखला देत ब्रिटनकडून राजकीय आश्रय मागितल्याचे समजते.

Related Stories

कुराणची समीक्षा करण्यावाचून पर्याय नव्हता

Patil_p

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर

Patil_p

तंतुवाद्यांसह निर्यात होणाऱ्या वस्तूवर वजन मोजून शुल्क आकारणार

Rohit Salunke

जनगणना, एनपीआरचे काम पुढील वर्षापर्यंत लांबणीवर

Patil_p

गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची दाणादाण,काय आहे विश्लेषकांचा अंदाज, जाणून घ्या एका क्लिकवर

Archana Banage