Tarun Bharat

प्रत्येकाने प्रत्येकाच्या बोलीभाषेचा मान राखला पाहिजे

ज्येष्ट  पत्रकार संदेश प्रभुदेसाई यांचे प्रतिपादन, पेडणे संतसोहिरोबानाथ महाविद्यालयात परिसंवादाचे आयोजन

प्रतिनिधी /पेडणे

प्रत्येकाने प्रत्येकाच्या बोलीभाषेचा मान राखला पाहिजे. भाषा किंवा व बोली कधीच शुद्ध नसते. कारण ती प्रत्येक  समाजाप्रमाणे आणि प्रत्येक भौगोलिक परिसरानुसार भाषा बदलत असते असे प्रतिपादन  ज्येष्ट पञकार संदेश प्रभुदेसाई यांनी विर्नोडा पेडणे येथे केले.

 संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालय पेडणे येथील कोंकणी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ” कोंकणी भाषा आणि बोलयो”  ह्या विषयावर एक दिवसीय राज्य पातळीवरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी संदेश प्रभूदेसाई बोलत होते. परिसंवादाची सुरूवात सकाळी समई प्रज्वलीत करुन प्रमुख वक्ते संदेश प्रभुदेसाई यांच्या हस्ते करण्यात आली.

परिसंवादाचे प्रमुख वक्ते  संदेश प्रभुदेसाई (गोमंतकातील नामवंत लेखक आणि पत्रकार) यांच्या हस्ते बोली भाषेवर आधारित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाच्या पहिल्या सत्रात कोंकणी भास-मुळावण आनी विकास ह्या विषयावर डॉ.हनुमंत चोपडेकर आपला निबंध सादर केला तर “कोंकणी भाशेचे प्रमाणीकरण-फुडाराची नदर “ह्या विषयावर डॉ.डॅनिस वाझ निबंध सादर केला.  या सत्राचे सत्राध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.भूषण भावे उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात कोंकणींतल्यो विंगड विंगड बोलयो ह्या विषयावर प्राध्यापक धर्मा चोडणकरांनी आपले प्रपत्र सादर केले तर. कोंकणीच्या पेंडणे बोलयेंतली साहित्यीक अभिव्यक्ती ह्या विषयावर प्राध्यापक अव्द?त साळगांवकर यांनी आपला निबंध सादर केला. सत्राचे सत्राध्यक्ष  म्हणून प्रो.डॉ.प्रकाश वजरीकर उपस्थित होते.

शेवटच्या समारोप सत्रात “माजी बोली माजो अभिमान” ह्या विषयाअंतर्गत कोंकणीच्या वेगवेगळय़ा बोलीतील जाणकारांनी चर्चा केली. यात शशिकांत पुनाजी(पेडणे बोली), गोपिनाथ गांवस(सत्तरी बोली), अशोक नेने(चित्पावनी बोली), प्रियांका लोटलीकर(सासष्टी बोली), फा.लुईस गोम्स(बार्देसी बोली), प्रा.कृपाली नायक (काणकोण बोली)  ह्या मान्यवरांनी पेपर सादर केला. स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य फिलीफ रॉड्रिग्स यांनी केले. या संपूर्ण चर्चासत्राचे समन्वयक कोंकणी विभाग प्रमुख प्रा. प्रियांका परब तसेच ग्रंथपाल डॉ. केशव धुरी आणि प्रा. अद्वैत साळगांवकर यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले .

यावेळी कार्यक्रमास डॉ. लुसी जेम्स, डॉ. रोहित फळगाकर, प्रा. नावसो परब, प्रा. अक्षय साखरकर, प्रा. आनंद कोळंबकर, डॉ. रंजिता परब, प्रा. अंजली नाईक, प्रा. संस्कृती महाले, प्रा. निकिता शिरोडकर, प्रा. मंजू महाले, प्रा. बंकिता नाईक, प्रा. अर्जुन मोराजकर, प्रा. श्रद्धा धोंड, प्रा. विविधा आगरवाडेकर, प्रा. पूजश्री पालयेकर आदी उपस्थित  होते.    

स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य फिलीफ रॉड्रिग्स यांनी केले. या संपूर्ण चर्चासत्राचे समन्वयक कोंकणी विभाग प्रमुख प्रा. प्रियांका परब तसेच ग्रंथपाल डॉ. केशव धुरी आणि प्रा. अद्वैत साळगांवकर यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले .

Related Stories

राष्ट्रपती कोविंद यांचे आगमन

Amit Kulkarni

हंगामी सभापतीपदी गणेश गावकर

Amit Kulkarni

पणजी महापौरपदी रोहित मोन्सेरात

Amit Kulkarni

कदंब कर्मचाऱयांचा आझाद मैदानावर धरणे मोर्चा

Amit Kulkarni

सरदेसाई यांनी जाब विचारल्यानंतर सरकारला जाग

Amit Kulkarni

बिटस् पिलानीचे विद्यार्थी फोर्ब्स 30 आशिया 2022च्या यादीत

Amit Kulkarni