Tarun Bharat

प्रत्येक घटकाची विद्यापीठाशी एकनिष्ठता वाखाणण्यासारखी

नॅक पिअर कमिटीचे चेअरमन प्रा.जे. पी. शर्मा यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी / कोल्हापूर

गेल्या तीन दिवसांत येथील सर्वच घटकांमध्ये एक अनोखा उत्साह आणि मिळून काम करण्याची ऊर्जा सर्वत्र जाणवत राहिली. ही बाब फार महत्त्वाची आहे. याच पद्धतीने विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकदिलाने कार्यरत राहावे. शिवाजी विद्यापीठातील सर्वच घटकांची कार्यशैली, उत्साह आणि निष्ठा वाखाणण्याजोगी आहे, असे प्रतिपादननॅक’ पिअर समितीचे अध्यक्ष प्रा. जे. पी. शर्मा यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या नॅक'च्या चौथ्या पुनर्मूल्यांकनासाठी गेले तीन दिवस डॉ. शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समिती विद्यापीठात दाखल झाली होती. या प्रक्रियेची सांगता बुधवारी औपचारिकएक्झिट मिटींग’ने झाली. त्या बैठकीत ते बोलत होते.
प्रा. शर्मा म्हणाले, शिवाजी विद्यापीठाची पाहणी हा आम्हा समिती सदस्यांसाठीच एक उत्तम व अनेक नवीन गोष्टी सांगणारा अनुभव राहिला. विद्यार्थ्यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम तर अतिशय उल्लेखनीय होता. याच एकात्मतेने आपण शिवाजी विद्यापीठाला उंचीवर घेऊन जाल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठामध्ये आपल्याला कोल्हापुरी आतिथ्यशीलतेचा अतिशय उत्तम अनुभव आल्याचेही त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, कोविड-19च्या महामारीचे सावट असतानाही समितीचे सर्वच सदस्य देशाच्या कानाकोप्रयातून कोल्हापूर येथे दाखल झाले, याबद्दल त्यांना खरोखरीच धन्यवाद द्यायला हवेत.

विविध अधिविभागांना भेटी देऊन पाहणी करताना तसेच विविध घटकांशी संवाद साधताना समिती सदस्यांनी मनमोकळेपणाने मौलिक सूचनाही केल्या. त्या सूचनांचा विद्यापीठ निश्चितपणाने पाठपुरावा करून अंमलात आणेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नॅक' मूल्यांकनाची ही फेरी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे विभागप्रमुख, शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अधिसभा यांसह सर्वच अधिकार मंडळांनी सहकार्य केले. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, नॅक पिअर समितीचे सदस्य प्रा. बी. आर. कौशल, प्रा. एस. ए. एच. मोईनुद्दिन, प्रा. तरुण अरोरा, प्रा. सुनील कुमार व प्रा. हरिश चंद्रा दास उपस्थित होते. विद्यापीठ मूल्यांकनाचा गोपनीय अहवाल नॅक बंगळुरूला सादर होणार प्रा. शर्मा यांनीनॅक’ ला सादर करण्यात येणाऱया गोपनीय अहवालाची एक प्रत कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सादर केली. हा अहवाल नॅक पिअर समितीतर्फे `नॅक’ बंगळुरू यांना सादर करण्यात येणार आहे.

Related Stories

तलाठी कार्यालये पडली ओस…

Archana Banage

भारताची लोकसंख्या एक अब्ज ३०० कोटी- इम्रान खान

Archana Banage

ईडीची कारवाई बोगस, काहीही झाले तरी गुडघे टेकणार नाही; राऊतांचा इशारा

Archana Banage

साताऱयात पावसाचा शिडकावा

Patil_p

सोलापुरात आणखी चार रुग्ण वाढले; कोरोनाग्रस्तांचा आकडा 25 वर

Archana Banage

अंबाबाई मंदिर सिक्युरीटीत ‘एक्सलन्स’

Archana Banage