Tarun Bharat

प्रत्येक जिल्हय़ात सायबर पोलीस स्थानक

Advertisements

गृहमंत्री बसवराज बोम्मई : बेळगाव, म्हैसूर, मंगळूर, गुलबर्गा विभागात एफएसएल प्रयोगशाळा

प्रतिनिधी / बेंगळूर

पुढील काही महिन्यांत राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये सायबर पोलीस स्थानक सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. उडुपी जिल्हय़ाच्या कार्कळमध्ये नूतन पोलीस वसतिगृह बांधकामाचे उद्घाटन करून ते बोलत होते.

बोम्माई पुढे म्हणाले, सायबर गुन्हेगारी कमी करण्यासाठी सर्व जिल्हय़ांमध्ये सायबर पोलीस स्थानक सुरू करण्यात येणार आहे. सध्या 6 हजार पोलीस कर्मचाऱयांची नेमणूक प्रक्रिया सुरू असून आगामी 3 वर्षांमध्ये 16 हजार पोलीस पदे भरली जाणार आहेत. यामुळे गृह खात्याला बळ मिळणार आहे. याचबरोबर बेळगाव, म्हैसूर, मंगळूर आणि गुलबर्गा विभागात प्रत्येकी एक-एक एफएसएल प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार, असे त्यांनी सांगितले.

पोलीस प्रशासनात सुधारणा आणण्यासाठी डीजीपींच्या नेतृत्त्वाखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच पोलीस व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. दहा वर्षांपूर्वी सायबर गुन्हे नव्हते. मात्र अलिकडे राज्यात सायबर गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर नवे आव्हान उभारले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व जिल्हय़ांत सायबर पोलीस स्थानक सुरू करण्यात येणार आहे, असेही बोम्माई म्हणाले.

Related Stories

कर्नाटक शनिवार-रविवार कर्फ्यूः गरज वाटल्यास केएसआरटीसी मर्यादित सेवा देणार

Archana Banage

कर्नाटकातील ‘या’ ५ जिल्ह्यात शाळा बंदच

Archana Banage

सोमवारपासून 14 दिवस लॉकडाऊन

Amit Kulkarni

कर्नाटक: बंडखोर मंत्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार

Archana Banage

कॉन्स्टेबल परीक्षेत बोगस विद्यार्थी : 61 जणांना अटक

Amit Kulkarni

ऑक्सिजनविना 24 रुग्णांचा मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!