Tarun Bharat

प्रथम सर्व सुविधा उपलब्ध करा, नंतरच ऑनलाइन शिक्षण

मगो पक्षातर्फे डिचोली उपजिल्हाधिकाऱयांना निवेदन. मुख्यमंत्र्यांचे शिक्षणाकडे लक्षच नाही. ते आमदार फोडून सरकार टिकविण्यातच व्यस्त.

  प्रतिनिधी / डिचोली

सरकारने राज्यात ऑनलाइन शिक्षणाचा आदेश देऊन ते सुरूही केले. मात्र या आधुनिक प्रकारच्या शिक्षण पध्दतीसाठी राज्यातील विद्यार्थांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत कि नाही याछी शाश्वती करून घेतलेली नाही. त्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावी आणी नंतरच ते सुरू करावे. तोपर्यंत हि शिक्षण पध्दती बंद ठेवावी, अशी मागणी करणारे निवेदन मगो पक्षातर्फे डिचोली उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर यांच्याकडे सादर करण्यात आले.

यावेळी मगो पक्षाचे राज्य अध्यक्ष दिपक ढवळीकर, डिचोली गटाचे अध्यक्ष नरेश कडकडे व इतरांची उपस्थिती होती. सरकारने एका झटक्मयात ऑनलाइन शिक्षणाचा फतवा काढला.आणि ते सुरूही केले. परंतु त्यासाठी सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक सज्ज आहेत की नाही, याची साधी शाश्वतीही करून घेतली नाही. अनेक ग्रामीण भागात आज मोबाईल नेटवर्क नाहीत, मोबाईल मनोरे नाहीत, मुलांकडे स्वतंत्र मोबाईल नाहीत. त्यांना पालकांचा मोबाईल वापरावा लागतो. हे सामान्य कुटुंबातील सदस्यांना फारच अडचणीचे ठरत आहे. असे यावेळी दिपक ढवळीकर यां?नी म्हटले.

कोवीड महामारीमुळे गेले वर्षभर अनेक संकटांना तोंड दिलेल्या अनेक जणांचे धंदे व्यवसाय गेले आहेत. नोकऱयाही गेलेल्या आहे. त्यामुळे सर्वचजण आर्थिक अडचणीत आहेत. अशा वेळी मुलांच्या शिक्षणासाठी नवीन मोबाईल खरेदी करणे प्रत्येक पालकाला आणि कुटुंबाला शक्मय नाही. अशा परिस्थितीत सरकारने या ऑनलाइन शिक्षणाचे संपूर्ण ओझे पालांवरच टाकले आहे. नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना झाडांवर, डोंगराळ भागात तसेच निर्जनस्थळी राहून शिक्षण घ्यावे लागत आहे. अशा परिस्थितीमुळे विद्यार्थांना आणि पालकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यासाठी सध्या हे ऑनलाइन शिक्षण बंद.करून विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा घरपोच उपलब्ध करून द्या आणि नंतरच पूर्णक्षमतेने ऑनलाइन शिक्षण सुरू करा, अशी मगो पक्षाची मागणी आहे. असे दिपक ढवळीकर यांनी सांगितले.

सरकारने विद्यार्थ्यांना मोबाईल देणे गरजेचे आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना सरकारतर्फे महागडे लेपटॉप दिले जात होते. मात्र आज विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असलेले मोबाईल उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडे धोरणच नाही. ऑनलाइन शिक्षण हि आधुनिक आणि येणाऱया काळाची गरज आहे. मात्र त्यासाठी सर्व सोयी सुविधा सरकारने सर्वप्रथम उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र सरकारला त्याचे काहीच पडून गेलेले नाही. मुख्यमंत्र्यांचे शिक्षणावर लक्षच नाही. ते केवळ आपले सरकार टिकविण्यासाठी इतर पक्षातील आमदार जमा करण्यातच व्यस्त आहेत, अशी टिका यावेळी दिपक ढवळीकर यांनी केली.    ऑनलाइन शिक्षण हे येणाऱया पिढीसाठी नुकसानीचे ठरणार असून सरकारने त्यासाठी आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करणे गरजेचे होते. ज्या मगो पक्षाने स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि सर्वप्रथम शिक्षणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याकडे आज या सरकारने लक्षपूर्वक पहावे. त्याप्रकारच्या सोयी सर्वप्रथम तयार करूनच ऑनलाइन शिक्षणाला सुरूवात करणे आवश्यक होते. य सर्व गोष्टी होईपर्यंत सरकारने ऑनलाइन शिक्षण पध्दती सध्यातरी बंदच ठेवावी, अशी मागणी यावेळी नरेश कडकडे यांनी केली.

Related Stories

ग्राहक मिळविण्याच्या स्पर्धेत हॉटेलच्या दरात मोठी कपात

Patil_p

काणकोणातील फिरत्या मासेविक्रीस आक्षेप

Omkar B

प्राणवायू, कोरोना औषधे, लसींच्या उपलब्धतेचा अहवाल दररोज जाहीर करा

Amit Kulkarni

धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न सुटणार

Amit Kulkarni

कोरोनाच्या होरपळीत महागाईचे चटके

Amit Kulkarni

दिवाळीच्या पूर्वसंध्येला नाटय़संगीत मैफलीचे आयोजन

Omkar B