Tarun Bharat

प्रदर्शनापूर्वीच ‘आरआरआर’ची 900 कोटींचा कमाई

दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा आगामी चित्रपट ‘आरआरआर’ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला आहे. या चित्रपटात अजय देवगण, आलिया भट्टसह दाक्षिणात्य स्टार राम चरण, ज्युनियर एनटीआर दिसून येणार आहेत. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच सुमारे 900 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी रक्कम मानली जात आहे.

आंध्रप्रदेशच्या वितरकांनी 170 कोटी रुपये दिले आहेत. तर हिंदीभाषिक क्षेत्रातून 140 कोटी रुपये, तेलंगणातून 75 कोटी कर्नाटकातून 45 कोटी रुपये, केरळमधून 15 कोटी आणि ओव्हरसीज प्रदर्शनासाठी 70 कोटी रुपयांमध्ये हक्क विकले गेले आहेत. याचबरोबर डिजिटल हक्क 170 कोटी रुपयांमध्ये प्रदान करण्यात आले आहेत. उपग्रहीय हक्क 130 कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहेत. संगीतविषयक हक्क 20 कोटी रुपयांना देण्यात आले आहेत.

Related Stories

अभिनेता विशालने मीरासोबतचा फोटो केला शेअर, पोस्ट व्हायरल

Archana Banage

जीवनपटात श्रद्धाच्या जागी नुसरत भरुचा

Amit Kulkarni

सोनाक्षीही होणार दुसरी पत्नी

Patil_p

ऐश्वर्या रजनीकांत अन् धनुष विभक्त

Patil_p

जेनिफर विंगेट करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Patil_p

चोरीचा मामला आता पाच भाषांमध्ये

Patil_p