Tarun Bharat

प्रदेश युवा काँग्रेस अध्यक्षपदी रक्षा रामय्याच

Advertisements

बेंगळूर : कर्नाटक प्रदेश युवा काँग्रेस अध्यक्षपदाचा वाद अखेर मिटला असून 31 डिसेंबरपर्यंत या पदावर रक्षा रामय्याच असतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी हा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते रक्षा रामय्या हे कर्नाटक प्रदेश युवा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आहेत. यापूर्वी राजीनामा द्यावा लागलेल्या मोहम्मद नलपाड यांची या पदावर पुन्हा वर्णी लावण्यात यावी, अशी मागणी होत होती. दरम्यान या दोन्ही गटांसोबत डी. के. शिवकुमार यांनी चर्चा करून समझोता केला. 31 डिसेंबर 2021 पर्यंत रक्षा रामय्याच प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष असतील. त्यानंतर त्यांना पक्षाच्या राष्ट्रीय समितीमध्ये स्थान देण्यात येईल. तर 31 डिसेंबरनंतर मोहम्मद नलपाड यांना कर्नाटक प्रदेश युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नलपाड आणि रक्षा रामय्या यांच्या गटामध्ये निर्माण झालेला वाद शमला आहे.

Related Stories

दाम्पत्यासह मुलीचा बुडून मृत्यू

Amit Kulkarni

पर्यटकांसाठी राज्यात लवकरच हेलिटुरिझम

Amit Kulkarni

Karnataka : गुजरात निवडणुकीनंतर कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार; मुख्यमंत्र्यांचे संकेत

Abhijeet Khandekar

कर्नाटकात मंगळवारी २ हजाराहून अधिक रुग्णांची भर

Abhijeet Shinde

कर्नाटकमध्ये बुधवारी कोरोनाचे ६,९९७ नवीन रुग्ण

Abhijeet Shinde

विद्यार्थ्यांच्या बसपास मुदतीत 10 डिसेंबरपर्यंत वाढ

Omkar B
error: Content is protected !!