Tarun Bharat

प्रधानमंत्री सन्मान योजनेची माहिती एका कॉलद्वारे मिळणार

प्रतिनिधी/ मालवण

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना देशातील शेतकऱयांसाठी महत्वाची योजना आहे. या योजनेचा लाभ देशातील कोटय़वधी शेतकरी घेत आहेत. दरवषी 6000 रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱयांच्या खात्यात देणारी ही देशातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेबाबत केंद्र सरकारतर्फे शेतकऱयांच्या मोबाईलवर नुकताच एक संदेश पाठविला असून 011-24300306 या क्रमांकावर कॉल करून शेतकरी त्यांच्या अर्जाची, खात्याची स्थिती जाणून घेऊ शकतात.

 या योजनेतून ऑगस्टपासून 2000 रुपयांचा हप्ता पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी हा संदेश शेतकऱयांच्या मोबाईलवर पाठविण्यात आला आहे. या संदेशामुळे शेतकऱयांच्या बऱयाच अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. सरकारकडून पाठविण्यात आलेल्या संदेशात एका लाभार्थ्याला एक हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. लाभार्थी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून त्यांच्या अर्जाची, खात्याची स्थिती जाणून घेऊ शकतात. पीएम किसानच्या 011-24300306 या क्रमांकावर कॉल करून शेतकरी आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतात.

 या योजनेचा आत्तापर्यंत 9.54 कोटी शेतकऱयांची डाटा पडताळणी झाली आहे. तर 1.3 कोटी शेतकऱयांना अर्ज करून आणि पोर्टलवर नाव येऊनही लाभ मिळालेला नाही. अशा शेतकऱयांना या हेल्पलाईनवर संपर्क करून आपली समस्या मांडता येणार आहे. पीएम किसान योजनेसंदर्भातील कोणत्याही अडचणी किंवा तक्रारींसाठी शेतकरी 0120-6025109 या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क साधू शकतात. योजनेविषयीची कोणतीही माहिती मेलद्वारेही मागवू शकतात. यासाठी शेतकऱयाला pmkisan-ict@gov.in या मेल आयडीवर संपर्क करावा लागेल. 

Related Stories

ऑनलाईन शिक्षणासाठी ग्रामीण मुलांची ‘वणवण’

NIKHIL_N

नागरिकांना पैशांसाठी पोस्टाचा आधार

NIKHIL_N

आरे-वारेतील ‘ओशन फ्लाय झिपलाईन’ आता कायमस्वरूपी

Patil_p

नगर परिषदेच्या खोदाईत ट्रक अडकला

Patil_p

लॉकडाऊनमध्येही रोजगार हमी योजनेने दिले सामान्यांना काम

Patil_p

चिपळुणात कोरोना वाढता वाढता वाढे!

Patil_p