Tarun Bharat

प्रभाकर उर्फ बाबा सावंत यांचे निधन

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ बाबा आत्माराम सावंत (वय 80, शिवराज कॉलनी कदमवाडी रोड ) यांचे राहत्या घरी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाच वार्ता कळताच शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुल, सूना नातवंडे असा परिवार आहे. सीपीआरचे बंटी सावंत यांचे ते वडील होत.

बाबा सावंत हे 1998 पासून शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या अध्यक्ष पदाची धुरा नेटाने सांभाळत होते. त्यांनी विद्यापीठ कर्मचाऱयांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्यांच्या आंदोलनामुळे युनिव्हर्सिटी अॅक्ट बदलून मनमानी कारभार करणाऱ्या कुलगुरूंची चौकशी करून दोषी आढळल्यास पदावरून हटवण्याची, अशी तरतूद करण्यात करण्यात आली. याची दखल राज्य शासनाने घेवून अधिवेशनात रितसर कायद्यात तरतूत करण्याचा निर्णय घेतला. विहार पाटील आणि बाबा सावंत यांनी केलेल्या आंदोलनामुळे सेल्फ सपोर्टींग (प्रेस विभाग) विभागातील कर्मचाऱयांना पेन्शन यांजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला. ते संयमी व अभ्यासू असल्याने कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे बाबा सावंत यांची राज्यभरातील विद्यापीठात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासाठी आमरावती विद्यापीठातील महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या एका बैठकीत नुकतेच मार्गदर्शन केले होते.

Related Stories

राधानगरी धरण स्थळावर शाहू जयंती साजरी करणार्‍या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ऐनीत आठ शेतकऱ्यांच्या घरवजा गोठ्यांना आग

Abhijeet Shinde

कोल्हापूर : लक्षतीर्थ परिसरात तीन गवे

Abhijeet Shinde

कोरोनाच्या दुसऱया लाटेत अनेक जिल्हय़ांत रक्ताचा तुटवडा

Abhijeet Shinde

शेती विकास साधण्यासाठी जिल्हा बँक नेहमीच आघाडीवर राहिली पाहिजे : आमदार राजूबाबा आवळे

Abhijeet Shinde

इचलकरंजी पालिकेतील बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!