Tarun Bharat

प्रभाग रचनेचा सस्पेन्स संपणार…

Advertisements

कोल्हापूर / प्रतिनिधी

महापालिका निवडणूकीच्या प्रभाग रचनेचा अखेर सस्पेन्स संपणार आहे. उद्या मंगळवारी सकाळी 10 वाजता मनपाच्या वेबसाईटसह चार विभागीय कार्यालयामध्ये प्रभाग रचना प्रसिद्ध होणार आहे. 31 वॉर्ड आणि 92 नगरसेवक असे त्याचे स्वरूप आहे.

कोल्हापूर महापालिका सभागृहाची 15 नोव्हेंबर 2021 रोजी मुदत संपली आहे. कोरोनामुळे दोन वेळा निवडणूक लांबणीवर पडली. दरम्यान, एक सदस्यीय प्रभाग रचनाही राज्य शासनाने रद्द करत बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे महापालिकेने 15 जानेवारीला प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा पाठविला होता. आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेला ग्रीन सिंग्नल दिला असून मनपाला मंगळवारी (1) प्रसिद्ध करण्याचे आदेश दिलेत. मनपाच्या वेबसाईटसह चार विभागीय कार्यालयामध्ये प्रभाग रचना पाहता येणार आहे.

हरकतीसाठी 14 दिवस
प्रारूप प्रभाग रचनेबाबत हरकत असल्यास मनपाच्या ताराबाई पार्कातील निवडणूक कार्यालयामध्ये दाखल करण्याचे आवाहन मनपाने केले आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती दाखल करून घेतल्या जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी, विभागीय कार्यालय प्रतिनिधी आणि मनपा अधिकारी यांच्या समोर यावर सुनावणी होणार असून 4 मार्च रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल.
प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध -1 फेब्रुवारी
हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख -14 फेब्रुवारी
राज्य निवडणूक आयोगाकडे हरकतींचा अहवाल -16 फेब्रुवारी
हरकतींवर सुनावणी -26 फेब्रुवारी
राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम अहवाल-2 मार्च
अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध -4 मार्च
प्रारूप मतदार यादीची प्रक्रिया -7 मार्च
उत्स्कुता संपली, उद्या होणार चित्र स्पष्ट
मागील महिन्यांपासून प्रभाग रचना हा चर्चेचा विषय बनली आहे. प्रथमच बहुसदस्यीय प्रभाग रचना होत आहे. एका वॉर्डमध्ये जुन्या तीन प्रभागाचा समावेश आहे. यामुळे एका वॉर्डमध्ये नेमके तीन प्रभाग कोणते असणार याची उत्स्कुता लागून होती. काही प्रभागाबाबत अफवाही पसरली होती. राजकीय हस्ताक्षेप झाल्याचा आरोपही झाला. मनपाने याचे खंडन केले. आपल्या वॉर्डची प्रभाग रचना काय असणार ते उद्या समजणार आहे.

गर्दी टाळा, ऑनलाईन प्रभाग रचना पहा
कोरोनाची तिसरी लाट अजुनही आहे. त्यामुळे प्रभाग रचना पाहण्यासाठी मंगळवारी एकाच ठिकाणी गर्दी करू नये. मनपाने चार विभागीय कार्यालयामध्ये प्रभाग रचना पाहण्याची सोय केली आहे. शिवाय मनपाच्या वेबसाईटवरही 31 वॉर्डमधील प्रत्येक वॉर्डची सविस्तर प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. वेळ प्रसंगी परिसरातील मोठय़ा हॉलमध्येही प्रभाग रचना उपलब्ध केली जाईल.
रविकांत अडसुळ, उपायुक्त, मनपा

Related Stories

सोलापुरात आतापर्यंत 210 जण कोरोनामुक्त होवून घरी

Archana Banage

Kolhapur, Satara Rain: राधानगरी धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे उघडले, तर कोयनेचे ६ वक्र दरवाजे उघडणार

Archana Banage

माजी विधानसभा अध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश

datta jadhav

बायडेन यांच्या शपथविधीला सशस्त्र आंदोलनाचा धोका

datta jadhav

कोरोना संकट; विश्वकर्मा समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी

Archana Banage

किरीट सोमय्यांचा पवार काका-पुतण्यावर हल्लाबोल

Archana Banage
error: Content is protected !!