Tarun Bharat

प्रभाग १५ मध्ये २५ लाखांच्या रस्ते कामांचा शुभारंभ

प्रतिनिधी / सांगली

शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील आंबडेकरनगर शास्त्रीनगरसह परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे रुपडे लवकरच पालटणार आहे. जवळपास २५ लाख रुपयांचा निधी रस्ते कामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. पाच रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

नगरसेवक मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, नागरसेविका आरती वळीवडे, पवित्रा केरीपाळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही राज्यमंत्री कदम यांनी यावेळी बोलताना दिली. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे शासन विकासाठी प्रयत्नशील आहे. नगरसेवक मंगेश चव्हाण म्हणाले, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. प्रभागातील आंबेडकर नगर, शास्त्रीनगर मधील पाच रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे.

Related Stories

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे यांचा अपघात

Archana Banage

सांगली जिल्ह्यात केंद्रीय सैनिक स्कूल स्थापन करावे : खा. संजय पाटील

Archana Banage

ताकारीसाठी २.११ टीएमसी पाण्याचा वापर

Archana Banage

भाजप अल्पसंख्याक सांगली जिल्हाध्यक्ष शेख यांचा शिवसेनेत प्रवेश

Archana Banage

Sangli : अखेर म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू..!

Abhijeet Khandekar

सांगली : नळाचे पाणी बंद केल्याने कुटुंबाला मारहाण

Archana Banage
error: Content is protected !!